शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथील एल अँड टी फाटा येथे गुरुदत्त इंजीनियरिंग या कंपनीमध्ये क्रेनच्या सहाय्याने काम सुरु असताना क्रेनमधील डिक्स अंगावर पडल्याने धम्मपाल तुकाराम इंगोले या कामगाराचा मृत्यू झाला असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सणसवाडी (ता. शिरुर) येथील एल अँड टी फाटा येथे गुरुदत्त इंजीनियरिंग या कंपनीमध्ये धम्मपाल इंगोले हा कामगार कामाला असून आज आठ डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास कंपनीत क्रेनच्या सहाय्याने काम सुरु असताना क्रेन मधील डिक्स धम्मपालच्या अंगावर पडली. यावेळी कंपनीतील कामगारांनी धम्मपाल यास उपचारासाठी शिक्रापूर येथील ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी धम्मपाल तुकाराम इंगोले (वय २2) रा. बजरंगवाडी शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे मूळ रा. राजवाडी पोस्ट शिरळी ता. वसमत जि. हिंगोली याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याने घोषित केले.
याबाबत आकाश तुकाराम इंगोले (वय २४) रा. बजरंगवाडी शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे मूळ रा. राजवाडी पोस्ट शिरळी ता. वसमत जि. हिंगोली यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वेरणनाथ मुत्तनवार हे करत आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या टोलनाक्यांपासून जलजीवन मिशनच्या ४३८ कोटींपर्यंत मुद्दे केंद्रीय मंत्र्यांकडे मांडले मुंबई: लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात…
पुणे : हवाई दलाच्या एका मृत जवानाच्या नावाने बनावट ओळखपत्र बनवून सैन्याचा अधिकृत गणवेश मिळवण्याच्या…
सीमांकन, महिला आरक्षण आणि FCRA विधेयकांवरून सरकार-विरोधक आमनेसामने नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा तिसरा…
जळगाव : शहरातील अयोध्या नगर परिसरात शाळकरी विद्यार्थ्यांमधील जुन्या वादाला हिंसक वळण मिळाल्याची धक्कादायक घटना…
पुणे : नोकरीच्या शोधात परदेशात जाणाऱ्या महिलांना चांगला पगार आणि उज्ज्वल भविष्याचं आमिष दाखवून त्यांची…
शिरूर: शिरसवडी (ता. हवेली) येथे जमीन व्यावसायिक संतोष गावडे यांची गाडी तिघांनी आपली गाडी बंद…