क्राईम

पाबळमध्ये किरकोळ वादातून युवकाला मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): पाबळ (ता. शिरुर) येथे एका युवकासोबत झालेल्या वादातून युवकाच्या भावाला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे वृषभ संजय गायकवाड या युवकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

पाबळ (ता. शिरुर) येथील गणेश चौधरी व वृषभ गायकवाड या दोघांमध्ये मागील आठवड्यात वाद झाला होता. त्यामुळे वृषभ हा गणेशच्या घरी गेला. त्यावेळी गणेशचा भाऊ महेश घरासमोर उभा असताना वृषभने गणेश बाबत विचारपूस करत शिवीगाळ, दमदाटी सुरु केली त्यावेळी महेशत्याला समजावून सांगत असताना त्याने महेश चौधरी यास लोखंडी गजाने मारहाण करत जखमी केले.

याबाबत महेश दत्तात्रय चौधरी (वय २२) रा. पाबळ (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी वृषभ संजय गायकवाड रा. पाबळ (ता. शिरुर) जि. पुणे याचे विरुद्ध गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल ढेकणे व पोलीस शिपाई राहुल वाघमोडे हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

10 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

14 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

14 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

14 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

14 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

15 तास ago