मुंबई: अभिनेता कमाल आर खान अर्थात केआरकेला काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी विमानतळावरुन अटक केली होती. आता केआरकेला जामिनावर सोडण्यात आले आहे. 2020 मध्ये केलेल्या एका वादग्रस्त ट्विट प्रकरणी केआरकेला पोलिसांनी अटक केली होती. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर केआरकेने ट्विटवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये केआरकेने लिहिले की, मी माझ्या घरी सुखरुप परतलोय. तसे कमाल आर खान आणि वाद हे समीकरण मुळात नवे नाही.
मी सुखरुप माझ्या घरी परतलो आहे…
केआरकेने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, ‘मीडिया नवीन स्टोरी तयार करत आहे. मी सुखरुप माझ्या घरी परत आलो आहे. मला कोणाकडून बदला घेण्याची गरज नाही. माझ्यासोबत जे काही वाईट घडले ते सर्व मी विसरलो आहे. ते माझ्या नशिबातच लिहिलेले असेल असे मला वाटत आहे. 2020 मध्ये केलेल्या एका वादग्रस्त ट्विटसाठी मुंबई पोलिसांनी केआरकेला 30 ऑगस्ट रोजी अटक केली होती.
माझ्यासोबत जे काही घडले ते मी विसरलो…
जामीन मिळाल्यानंतर केआरके नेमके काय ट्विट करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सुरुवातीला जामीन मिळाल्यावर केआरकेने एक ट्विट केले होते, त्यामध्ये लिहिले होते की, मी बदला घेण्यासाठी परत आलो आहे. मात्र, त्यानंतर केआरकेने जे दुसरे ट्विट केले त्यानंतर सर्वांना मोठा आर्श्चयाचा धक्काच बसलाय कारण दुसऱ्या ट्विटमध्ये केआरकेने जे घडले ते मी विसरलो असल्याचे म्हटले आहे.
तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…
शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांचे अत्यंत निष्ठावंत मानले जाणारे माजी गृहमंत्री…
शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…
जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…