क्राईम

शिवाजीनगर सत्र न्यायालयात लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपीस १० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिवाजीनगर सत्र न्यायालयात आज झालेल्या सुनावणीत शिरूर येथील बबलु उर्फ अमीर शब्बीर बाले (वय ३१) या आरोपीस बाल लैंगिक अत्याचारप्रकरणी दोषी ठरवून १० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. यासोबतच आरोपीवर १०,००० रुपयांचा दंडही लावण्यात आला असून, दंड न भरल्यास अतिरिक्त एक महिन्याची शिक्षा भोगावी लागेल, असे आदेश देण्यात आले.

या प्रकरणी गुन्हा र.नं. 289/2014 प्रमाणे भारतीय दंड विधान कलम 376 तसेच पोक्सो कायद्याच्या कलम 3, 4, 6 व 8 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. विशेष न्यायालय (स्पे. केस नं. 293/14) समोर सुनावणी सुरू होती. दुसरा आरोपी शब्बीर अब्दुल बाले (वय ५२) हा न्यायप्रक्रियेपूर्वीच मृत्यूमुखी पडला होता.

या खटल्याचे कामकाज ए. एस. वाघमारे (सो. जिल्हा व सत्र न्यायाधीश, पुणे) यांच्या न्यायालयात पार पडले. सरकारी पक्षाचं प्रतिनिधित्व प्रसिद्ध सरकारी वकील मारुती वाडेकर यांनी यशस्वीपणे केलं.

प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर (सेवानिवृत्त) व सध्या मुंबईत कार्यरत असलेल्या पोलीस निरीक्षक श्रीमती सुवर्णा हुलवान यांनी केला होता. कोर्ट पैरवीसाठी पो.हवा. बाळासाहेब गदादे (बं.नं.3296) आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल रेणुका भिसे (बं.नं.517) यांनी जबाबदारी पार पाडली.

प्रभारी अधिकारी म्हणून शिरूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदेश केंजळे कार्यरत होते. सत्र न्यायालयात कोर्ट पैरवी अंमलदार म्हणून श्रेणी पोलीस उपनिरीक्षक विद्याधर निचीत आणि जिल्हा कोर्टाचे पैरवी अधिकारी संतोष घोळवे यांचेही या प्रकरणात मोलाचे सहकार्य लाभले. समन्स व वॉरंट अंमलाची जबाबदारी पोहवा वाडेकर यांनी सांभाळली.

या निर्णयामुळे पीडितेला न्याय मिळाला असून, अशा गंभीर गुन्ह्यांविरोधात न्यायालय कठोर भूमिका घेत असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

18 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

1 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

2 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

2 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

2 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

2 दिवस ago