क्राईम

उच्चशिक्षित विवाहितेवर विष पाजून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न; पती फरार

नाशिक: पुण्यात इंजिनिअर विवाहितेच्या आत्महत्येच्या घटनेनंतर राज्यात खळबळ उडालेली असतानाच नाशिकमधूनही तितकाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रेमविवाहानंतर सासरच्यांकडून मानसिक व शारीरिक छळ सहन करावा लागलेल्या एका उच्चशिक्षित विवाहितेला मारहाण करून जबरदस्तीने विषारी औषध पाजल्याचा गंभीर आरोप तिच्या माहेरच्यांनी केला आहे. या घटनेनंतर शहरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

पीडित विवाहितेचे नाव महिमा मॉन्टी राजदेव (वय …) असे असून तिचा एप्रिल 2025 मध्ये मॉन्टी राजदेव याच्याशी प्रेमविवाह झाला होता. मात्र लग्नानंतर काही महिन्यांतच प्रेमविवाह केल्याच्या कारणावरून सासरच्यांकडून छळ सुरू झाल्याचा आरोप महिमाच्या कुटुंबीयांनी केला आहे. तिच्या आईनुसार, सासू, सासरे आणि दिर यांच्याकडून महिमाला सातत्याने संशय, अपमान आणि मानसिक दबावाला सामोरे जावे लागत होते.

माहेरच्यांच्या आरोपानुसार, चोरीच्या संशयावरून महिमाच्या बेडरूममध्ये कॅमेरे बसवण्यात आले होते. यामुळे तिच्या खासगी आयुष्यावर पाळत ठेवली जात होती. या प्रकारांमुळे ती भीतीच्या वातावरणात राहत होती आणि तिच्या मानसिक आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम झाला होता.

काल कुटुंबातील वादानंतर महिमाला सासरी बोलावण्यात आले. तेथे तिचा पती मॉन्टी राजदेव याने तिच्यावर मारहाण करत जबरदस्तीने विषारी औषध पाजल्याचा आरोप आहे. यानंतर महिमाची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने तिला प्रथम जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती अधिक बिघडल्याने तिला खासगी रुग्णालयात हलवण्यात आले असून सध्या तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपी पती घटना घडताच फरार झाल्याची माहिती आहे. पोलीस त्याचा शोध घेत असून पुढील तपास सुरू आहे.प्रेमविवाहानंतर महिलांवरील छळाच्या वाढत्या घटनांमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या गंभीर प्रकरणात पुढे कोणती कारवाई होते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पुणे-नगर महामार्गावर मध्यरात्री एसटी बस अडवून दहशत; काळ्या स्कॉर्पिओतून आलेल्या चौघांचा मध्यरात्री धुडगूस

शिरुर (तेजस फडके) पुणे-अहिल्यानगर महामार्गावर न्हावरे फाटा येथे मध्यरात्री धावणाऱ्या एसटी बसला एका काळ्या रंगाच्या,…

26 मिनिटे ago

ठाकरे गटात मोठी फूट पडणार? नरेश म्हस्केंचा मोठा दावा; म्हणाले…

मुंबई: राज्याच्या राजकारणात फोडाफोडीचे सत्र सुरू असतानाच आता ठाकरे गटाबाबत मोठा दावा करण्यात आला आहे.…

1 तास ago

ओबीसी आरक्षणासाठी भुजबळांनी रस्त्यावर उतरावे; अन्यथा पापाचे वाटेकरी ठराल : विजय वडेट्टीवार

नागपूर: राज्यात ओबीसी आरक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, ओबीसी समाजाचे राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक…

1 तास ago

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ४ हजार रहिवाशांच्या पुनर्वसनाला गती; एकनाथ शिंदेंचे निर्देश

मुंबई: गोरेगाव येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत आणि लगत राहणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनाला आता गती…

2 तास ago

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

20 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

24 तास ago