महाराष्ट्र

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा संघर्ष, सातत्य, पक्षनिष्ठा आणि संघटनात्मक कार्याचा आदर्श नमुना असल्याचे मत राष्ट्रवादी युवक काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे मुंबई उपाध्यक्ष ओमकार शिर्के यांनी व्यक्त केले.

सन १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली, त्यावेळी ॲड. अमोल मातेले यांना मतदानाचा अधिकारही नव्हता. मात्र, याच काळात घाटकोपर भटवाडी–बर्वे नगर येथील वॉर्ड क्रमांक १९५ च्या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष म्हणून त्यांच्या सामाजिक आणि राजकीय प्रवासाला सुरुवात झाली.

जुन्नर तालुक्यातील शेतकरी कुटुंबातून आलेल्या मातेले यांनी ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतून शिक्षण घेतले. पुढील शिक्षणासाठी मुंबईत आल्यानंतर त्यांनी विद्यार्थी चळवळीत सक्रिय सहभाग घेत संघटनात्मक कार्याला सुरुवात केली. जुना कुर्ला मतदारसंघ विद्यार्थी संघटनेचे तालुकाध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी आपल्या संघटन कौशल्याची छाप पाडली. सोमय्या कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतानाच त्यांनी तेथे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे युनिट स्थापन करून अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली.

त्यानंतर पक्षाने त्यांच्यावर विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या. मुंबई राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे सरचिटणीस, मुंबई अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आणि मुंबई अध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस अशा विविध पदांवर त्यांनी काम केले. आता त्यांची महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती झाली आहे.

विशेष म्हणजे, रूपारेल आणि न्यू लॉ कॉलेजमध्ये विधीचे शिक्षण घेत असतानाही त्यांनी मुंबई अध्यक्ष, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस ही जबाबदारी सांभाळली. शिक्षण आणि संघटनात्मक कामाचा समतोल साधत त्यांनी पक्षाचे काम सातत्याने पुढे नेले.

“अमोल मातेले यांचा हा केवळ पदांचा प्रवास नाही, तर ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातून आलेल्या सामान्य कार्यकर्त्याने संघर्ष आणि मेहनतीच्या जोरावर निर्माण केलेली राजकीय ओळख आहे. या प्रवासात शरद पवार साहेबांचे नेतृत्व आणि आशीर्वाद त्यांच्या पाठीशी राहिले,” असे ओमकार शिर्के यांनी सांगितले.

‘पद येतात आणि जातात; पक्षनिष्ठा मात्र कायम असते’, असे सांगत शिर्के म्हणाले की, आजच्या राजकारणात पद आणि सत्तेपेक्षा विचारांशी असलेली बांधिलकी महत्त्वाची आहे. पक्षाच्या संघर्षाच्या काळातही विचारांशी ठाम राहून सातत्याने काम करणे हीच खरी पक्षनिष्ठा आहे.

१९९९ पासून सुरू झालेली ॲड. मातेले यांची राजकीय वाटचाल आजही राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाच्या विचारांशी जोडलेली आहे. राजकीय परिस्थिती बदलली, आव्हाने आली आणि जबाबदाऱ्या बदलल्या; मात्र त्यांच्या कामातील सातत्य आणि पक्षनिष्ठा कायम राहिली. त्यामुळे त्यांचा प्रवास युवक कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी असल्याचेही शिर्के यांनी नमूद केले.

ॲड. मातेले यांच्यावर विश्वास ठेवून विविध जबाबदाऱ्या सोपविल्याबद्दल राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार, कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, ज्येष्ठ नेते जयंत पाटील, राष्ट्रीय प्रवक्ते जितेंद्र आव्हाड आणि आमदार रोहित पवार यांचे ओमकार शिर्के यांनी आभार मानले.

“संघर्षातून घडलेला कार्यकर्ता, सातत्याने काम करणारा संघटक आणि पक्षाशी निष्ठावान नेतृत्व म्हणून ॲड. अमोल मातेले यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाची संघटना अधिक मजबूत होईल,” असा विश्वास शिर्के यांनी व्यक्त केला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

5 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

5 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

5 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

5 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

5 तास ago

अजित पवारांच्या अपघाताचे राजकारण करू नका; सुनेत्रा पवारांचा विरोधकांना इशारा

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी अजित पवारांच्या अपघाताच्या मुद्द्यावरून…

6 तास ago