शिक्रापूरात आझाद समाज पार्टीच्या अध्यक्षावर दगडफेक

एका वकीलासह दोघांवर ॲट्रॉसिटी प्रकरणी गुन्हे

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे आझाद समाज पार्टीच्या शिरुर तालुका महिला अध्यक्षाला शिवीगाळ दमदाटी करत त्यांच्यावर दगडफेक करुन जीवे मारण्याची धमकी देत सोशल मीडियावर बदनामीकारक पोस्ट टाकल्याची घटना घडल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे ॲड. केदार खंडेराव शितोळे, केतन खंडेराव शितोळे व खंडेराव शितोळे या तिघांवर ॲट्रॉसिटी सह आदी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पाटवस्ती येथे डॉ. महेश खिलारे यांचे हॉस्पिटलचे बांधकाम सुरु असून त्यांच्या शेजारी असलेले ॲड. केदार शितोळे, केतन शितोळे व खंडेराव शितोळे हे तिघे डॉ. खिलारे यांच्या बांधकामाला विरोध करत असल्याने डॉ. खिलारे यांनी आझाद समाज पार्टीच्या महिला शिरुर तालुकाध्यक्षा सुरेखा गायकवाड यांना याबाबत सांगितल्याने ३ जानेवारी २०२३ रोजी सुरेखा गायकवाड यांनी काही महिला कार्यकर्त्यांसह डॉ. खिलारे यांच्या बांधकामाजवळ जात ॲड. केदार शितोळे व अन्य लोकांना बांधकाम करु द्या असे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.

त्यावेळी ॲड. केदार शितोळे, केतन शितोळे व खंडेराव शितोळे यांनी सदर महिलांना शिवीगाळ, दमदाटी करत जातीवाचक बोलून आझाद समाज पार्टीच्या शिरुर तालुकाध्यक्षा सुरेखा गायकवाड यांच्यासह अन्य महिला कार्यकर्त्यांच्या दिशेने दगडफेक करुन जीवे मारण्याची धमकी दिली. घडलेला सर्व प्रकार सुरेखा गायकवाड यांनी आझाद समाज पार्टीच्या पुणे जिल्हा महिलाध्यक्षा स्वाती गायकवाड यांना सांगितला. मात्र त्यानंतर ९ जानेवारी २०२३ रोजी ॲड. केदार शितोळे याने फेसबुक वर सदर महिलांसह डॉक्टर बाबत आक्षपार्ह पोस्ट टाकली सदर पोस्ट एका कार्यकर्त्याने आझाद समाज पार्टीच्या पुणे जिल्हाध्यक्षा स्वाती गायकवाड यांना पाठवला.

त्यामुळे याबाबत आझाद समाज पार्टीच्या महिला पुणे जिल्हाध्यक्षा स्वाती विलास गायकवाड (वय ३५) रा. ताडीवाला रोड मारुती मंदिर जवळ पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी ॲड. केदार खंडेराव शितोळे, केतन खंडेराव शितोळे व खंडेराव शितोळे तिघे रा. पाट वस्ती शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे या तिघांवर ॲट्रॉसिटी, शिवीगाळ, दमदाटी सह आदी गुन्हे दाखल केले असून पुढील तपास शिरुर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी व पोलीस हवालदार चंद्रकांत काळे हे करत आहे.

ॲड. केदार शितोळे यापूर्वी ही गुन्हे…

शिक्रापूर येथे ॲट्रॉसिटी सह अन्य गुन्हे दाखल झालेला वकील ॲड. केदार शितोळे याच्यावर यापूर्वी पोलीस ठाण्याच्या आवारात मारामारी करण्यासह एका रिक्षा चालकाला हाणामारी केल्या बाबतचे सुध्दा गुन्हे दाखल असल्याची देखील माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

2 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

17 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

23 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

23 तास ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

1 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

1 दिवस ago