Shikrapur Police Station
शिक्रापूर (शेरखान शेख): केंदूर (ता. शिरुर) येथील थिटेवाडी येथे एका हॉटेल चालकाने फुकट पाण्याच्या बाटल्या दिल्या नाही म्हणून ५ जणांच्या टोळक्याने हॉटेल चालकाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे विशाल दगडू पानसरे, हिरामण मारुती थिटे, वैभव विशाल पानसरे यांच्यासह २ अनोळखी युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
केंदुर (ता. शिरुर) येथील थिटेवाडी येथे योगेश खर्डे यांचे शिवमुद्रा हॉटेल असून खर्डे हे त्यांच्या हॉटेलमध्ये असताना दुपारच्या सुमारास विशाल पानसरे हा हॉटेलमध्ये आला. त्याने २ बिसलेरी पाण्याच्या बाटल्या फुकट मागितल्या यावेळी खर्डे यांनी त्याला बाटल्या न दिल्याने काही वेळाने पुन्हा विशालसह काही युवक दुचाकीहून हॉटेलमध्ये आले, त्यांनी खर्डे यास शिवीगाळ, दमदाटी करत तू आम्हाला ओळखत नाही का…?, मी थिटेवाडीचा भाई आहे, तू आम्हाला फुकट खायला द्यायला पाहिजे, तू आम्हाला फुकट खायला दिले नाही तर आम्ही तुला खलास करुन टाकू अशी धमकी देत हॉटेलजवळ पडलेल्या काठी व विटाने योगेश खर्डे यास मारहाण केली.
सदर घटनेत हॉटेल चालक योगेश खर्डे जखमी झाला असल्याने याबाबत योगेश जालिंदर खर्डे (वय ३४) रा. केंदूर थिटेवाडी (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी विशाल दगडू पानसरे, हिरामण मारुती थिटे, वैभव विशाल पानसरे यांच्यासह २ अनोळखी युवक सर्व रा. केंदूर (ता. शिरुर) जि. पुणे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक गणेश सुतार हे करत आहे.
पूर्वीच्या काळी लोक अशी कामं करत असत ज्यात शरीराला जास्त मेहनत करावी लागत असे. पण…
घसा खराब होणे, सोलवटल्यासारखे वाटणे आणि खाताना त्रास होणे हे अनेकदा बदलत्या हवामानामुळे, गरम-थंड पदार्थ…
आहार: सकाळचा नाश्ता: फळे, भाज्या, कडधान्ये आणि कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश करा. मीठाचे…
मुंबई : अन्न आणि औषध प्रशासनाच्या (FDA) धडाकेबाज कारवाईमुळे राज्यातील भेसळखोर आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या…
पुणे : गणेशोत्सवातील डीजे आणि वाढत्या ध्वनिप्रदूषणाविरोधात भूमिका मांडणारे सामाजिक कार्यकर्ते विद्याधर बापट यांना टीव्ही9…
पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये वाढत्या गुन्हेगारीच्या चर्चेदरम्यान सत्ताधारी भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका आणि माजी उपमहापौर शैलजा मोरे यांच्या…