शिक्रापुर पोलिस स्टेशन हद्दीतील जुगारांचे अड्डे बंद करण्याची मागणी

शिरुर (तेजस फडके) कोरेगाव भिमा, तळेगाव ढमढेरे, शिक्रापुर हद्दीत अंदाजे ६ जुगारांचे अड्डे चालु असुन हे जुगार अड्डे कायमचे बंद करण्यात यावेत अशी मागणी भाजपाचे आंबेगाव-शिरुरचे माजी तालुकाध्यक्ष सतिश पाचंगे यांनी केली आहे.

आठ दिवसांपुर्वीच शिक्रापुर येथील एका लॉजवर चाललेल्या अवैध वेश्या व्यवसायावर कारवाई करण्यात आली होती. शिक्रापुर हद्दीत जुगार, मटका, गावठी दारु, खर्रा अश्या अनेक अवैध धंद्याना ऊत आला आहे. परंतु पोलिसांचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. शिक्रापुर परिसरात अजुनही काही लॉजवर वेश्या व्यवसाय चालु असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

शिरुर तालुक्यात पान टपरीवर होतेय पेट्रोलची विक्री…?

रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन हद्दीत काही महिन्यापुर्वी तिहेरी खून झाला होता. यात एक महिला आणि दोन लहान मुलांचा आरोपीने गळा आवळून खून केला होता. त्यानंतर पेट्रोल टाकुन तिघांचे मृतदेह जाळन्याचा प्रयत्न केला होता. त्यासाठी जवळच असणाऱ्या एका पेट्रोल पंपावरुन एका बाटलीत पेट्रोल नेले होते. या घटनेनंतरही प्रशासनाने काहीच दखल घेतलेली नाही. शिरुर तालुक्यात आजही साध्या पान टपरीवर पान मसाला, खर्या बरोबर पेट्रोलही मिळत आहे. त्यामुळे प्रशासन यावर कारवाई करणार का…? अशी सगळीकडे दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. याबाबत शिक्रापुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

शिक्रापुर पोलिस स्टेशन हद्दीत कोरेगाव भिमा, तळेगाव ढमढेरे, शिक्रापुर हद्दीत अंदाजे ६ जुगारांचे अड्डे चालु असुन हे सर्व अड्डे तात्काळ बंद करण्याची मागणी मी शिक्रापुरचे पोलिस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्याकडे केली होती. परंतु अजुनही ते जुगार अड्डे सुरुच आहेत.

सतिश पाचंगे (भाजपा)

माजी तालुकाध्यक्ष 

आंबेगाव-शिरुर 

DYSP ऑफिस जवळच हाकेच्या अंतरावर चाललाय वेश्या व्यवसाय ; प्रशासनाचे दुर्लक्ष…?

उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना भेटायचय; आत सोडणारा खाजगी व्यक्ती सांगतोय मोबाईल बाहेर ठेवा

शिरुर-चौफुला रस्त्यावरील अपघातात एकाचा मृत्यू; मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

शिरूर तालुका टीम

Recent Posts

डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा! सांगवीत लोखंडी कमान कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…

7 तास ago

रक्ताचे नातेवाईक कुणीच पुढे आले नाहीत; ग्रामपंचायतीने स्वीकारली अंत्यविधीची जबाबदारी

आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…

7 तास ago

सोलापुरात अघोषित भारनियमनावर पालकमंत्री संतापले; स्वाभिमानीचा पलटवार

सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…

7 तास ago

‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांचा दुर्दैवी अंत; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…

7 तास ago

कायद्याची लाठी सर्वांसाठी समान आहे का? संतोष पंडित यांच्या अटकेने महाराष्ट्रासमोर मोठा सवाल!

लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…

8 तास ago

शिक्षक हे भविष्याचे खरे शिल्पकार; गुणवत्तापूर्ण शिक्षणातून सक्षम समाजाची उभारणी; सुनेत्रा पवार

पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…

8 तास ago