उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना भेटायचय; आत सोडणारा खाजगी व्यक्ती सांगतोय मोबाईल बाहेर ठेवा…

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके) शिरुर, रांजणगाव MIDC आणि शिक्रापुर या तीनही पोलीस स्टेशनवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस उपविभागीय अधिकारी नेमण्यात आले आहेत. त्यांचे कार्यालय कारेगाव एमआयडीसी मध्ये आहे. साहेबांना भेटायचं म्हटल्यावर तिथे एक खाजगी कर्मचारी तैनात आहे. त्याच्या मनावरच तेथील सगळा कारभार चालत असुन साहेबांना भेटायला आतमध्ये सोडताना नागरिकांना मोबाईल बाहेर ठेवण्याची तो तंबी देत आहे.

शिरुर तालुक्याला स्वतंत्र पोलीस उपविभागीय अधिकारी नेमण्यात आले आहेत. मात्र, हे अधिकारी वारंवार सामाजिक प्रश्नांबाबत अनुपस्थित आणि जनतेपासून दुर राहतात. सर्वसामान्य जनतेचे फोन, निवेदने दुर्लक्षित होत आहेत. जनतेसाठी वेळ नाही. पण काही मर्जीतल्या लोकांसाठी तास न तास केबिनमध्ये चर्चा झडत आहेत. त्यांच्या दालनाबाहेर खासगी व्यक्ती नागरिकांना आत सोडायचं की नाही हे ठरवते.

शिरुर, रांजणगाव MIDC आणि शिक्रापुर या तीनही पोलीस स्टेशनच्या विविध अवैध धंदेवाल्यांकडुन त्यांच्या खास पंटरद्वारे मोठ्या प्रमाणात वसुली होत आहे. त्यामुळे अवैध धंद्यावाल्यांवर कुठलाही अंकुश राहिला नसुन ‘अवैध धंदेवाले जोमात, उपविभागीय अधिकारी कोमात’ असं म्हणण्याची वेळ शिरुर तालुक्यातील नागरिकांवर आली आहे.

शिरुर तालुक्याला आता तात्काळ असा कर्तव्यनिष्ठ पोलीस उपविभागीय अधिकारी हवा, जो दरवाज्याआड न राहता थेट जनतेशी संवाद साधेल, गुन्हेगारांबाबत आक्रमक राहील आणि २४x७ जनतेसाठी सक्रिय असेल.

निलेश वाळुंज (अण्णापुर) 

सामाजिक कार्यकर्ते 

(क्रमश:) 

करडे येथील बाप-लेकीला अटक करण्यास पोलिसांकडुन टाळाटाळ की वरिष्ठ अधिकाऱ्याचा हस्तक्षेप…?

Video; स्थानिक गुन्हे शाखा करतेय अवैध धंद्यावर कारवाई ;परंतु शिरुर उपविभागीय कार्यालयाला कसलीच चिंता नाही

शिरूर ! Instagramवरून युवकासोबत केलेली ओळख युवतीला पडली महागात