क्राईम

दुकानासमोर बसलेल्या कुत्र्यावर केले सपासप 18 वार

पुणे: पुण्यातील पिंपरी चिंचवड शहर हादरवून सोडणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आकुर्डी येथील डी टू सी कमर्शियल दुकानासमोर बसलेल्या एका सायबेरियन हस्की जातीच्या कुत्र्याला दगडाने व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करत त्याची एका अज्ञात व्यक्तीने हत्या केल्याची घटना समोर आली आहे.ही घटना मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली असून दुकानाबाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संपूर्ण प्रकार कैद झाला आहे.

नेमकं घडलं काय

पिंपरी चिंचवड शहरातील आकुर्डी येथे डी टू सी कमर्शियल दुकानासमोर बसलेल्या कुत्र्याला आरोपीने अचानक लक्ष्य केले. सुरुवातीला त्याने दगडाने वार केले. नंतर लाकडी दांडक्याने एकामागून एक जोरदार प्रहार करून कुत्र्याला गंभीर जखमी केले. एवढ्यावरच न थांबता आरोपीने मृतावस्थेतील कुत्र्याला फरफडत रस्त्यावर आणले. या अमानुष कृत्याचे दृश्य पाहून नागरिक व प्राणीप्रेमी स्तब्ध झाले आहेत.

घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली आहे. प्राणीप्रेमींनी आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. दुकानाच्या मालकाने तातडीने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय दंड संहिता कलम 325, प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 मधील कलम 11(1) आणि इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

सीसीटीव्हीत घटना कैद

निगडी पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास वेगाने सुरू आहे. आरोपी कोण आहे, त्याचे हेतू काय होते, आणि त्याने असा अमानुष प्रकार का केला, याबाबत अद्याप निश्चित माहिती समोर आलेली नाही. पोलिसांच्या तपासानंतर यामागील कारण स्पष्ट होईल. दरम्यान, सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. प्राणीप्रेमी संघटनांनी पोलिस प्रशासनाकडे आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

7 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

11 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

11 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

11 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

11 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

11 तास ago