सुपरमार्केटमध्ये खरेदी करताना आपण अनेकदा चमकदार पॅकेजिंग, आकर्षक ऑफर्स आणि चविष्ट दिसणाऱ्या वस्तूंनी आकर्षित होतो. मात्र, या वस्तूंपैकी अनेक पदार्थ आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. या पदार्थांमध्ये असलेले प्रिझर्व्हेटिव्हज, कृत्रिम रंग, साखर आणि मिठाचे जास्त प्रमाण आपल्या आरोग्यावर दीर्घकाळ नकारात्मक परिणाम करू शकतात. इतकेच नाही तर हे पदार्थ खाल्ल्याने कालांतराने अनेक वेगवेगळ्या गंभीर आजारांचा धोका संभवतो.
१) रेडिमेड डेसर्ट मिक्सेस
रेडिमेड डेसर्ट मिक्सेस दिसायला आणि चविला आकर्षक वाटले तरी त्यात कृत्रिम चव, रंग, प्रिझर्व्हेटिव्ह आणि भरपूर साखर असते. यामुळे वजन वाढ, ब्लड शुगर लेव्हलमध्ये चढ-उतार आणि पाचन समस्याही निर्माण होऊ शकतात.
२) बिस्किट्स
बहुतेक बिस्किट्समध्ये मैदा, ट्रान्स फॅट आणि साखर भरपूर प्रमाणात असते. या गोष्टी आरोग्यासाठी अत्यंत घातक आहेत. विशेषतः जर आपण दररोज बिस्कीट खात असाल तर हे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे.
३) इन्स्टंट रॅमेन नूडल्स
या नूडल्समध्ये सोडियमचं प्रमाण खूप जास्त असतं आणि त्यात पोषणमूल्य जवळपास नसतातच. शिवाय, यामध्ये असलेली आर्टिफिशियल चव आणि वापरलेले तेल पचनासाठी नुकसानकारक ठरतात.
४) साखरयुक्त किंवा कार्बोनेटेड ड्रिंक्स
सॉफ्ट ड्रिंक्स किंवा पॅकबंद ज्यूसमध्ये भरपूर प्रमाणात साखर वापरलेली असते, जी इन्सुलिन रेसिस्टन्स, वजन वाढ आणि डायबिटीस सारख्या समस्यांना आमंत्रण देते.
५) बटर सब्स्टिट्यूट्स (मार्जरीन)
मार्जरीन हे नैसर्गिक बटरचा पर्याय म्हणून विकले जात असले तरी त्यात ट्रान्स फॅट्स असतात, जे हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकतात.
६) फ्रोजन डिनर्स
फ्रोजन डिनर्स म्हणजेच तयार करून फ्रीझ केलेले जेवण, हे अनेकवेळा प्रिझर्व्हेटिव्हज, सोडियम अशा आर्टिफिशियल घटकांचा वापर करुन तयार केले जाते. यामुळे दीर्घकाळ असे अन्नपदार्थ खाल्ल्यास आरोग्याला धोका पोहोचू शकतो.
(सोशल मीडियावरून साभार)
शिरुर (तेजस फडके) चिंचणी (ता. शिरुर) शिरूर आणि श्रीगोंदा तालुक्यातील शेतीसाठी जीवनदायिनी ठरलेल्या चिंचणी (ता.…
पिंपरी-चिंचवड : वाढत्या पिंपरी-चिंचवड शहराच्या सुरक्षिततेचा पाया अधिक मजबूत करण्यासाठी पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाला राज्य सरकारने…
थोरात, हंडोरे, नसीम खान यांच्यासह चौघांची समिती; तीन आठवड्यांत अहवाल सादर होणार मुंबई: नागपूर पदवीधर,…
मुंबई: महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी प्रदेश नेतृत्वाने आता नियोजनबद्ध पावले उचलण्यास सुरुवात…
शिरूर (अरुणकुमार मोटे): मलठण (ता. शिरूर) येथील मलठण-शिक्रापूर रस्त्यावरील एकनाथ दंडवते यांच्या घरावर रात्री सुमारे…
अनेक वेळा रक्ताच्या कमतरतेमुळे थकवा येणे, अशक्तपणा, त्वचा पिवळी पडणे, हात-पाय सुजणे इत्यादी एनिमियाचे लक्षण…