क्राईम

बापानेच केली चार वर्षाच्या चिमुकलीची हत्या…

मुंबई: मुंबईच्या अँटॉप हिल परिसरातून माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर येत आहे. सावत्र पित्याने चार वर्षाच्या मुलीची हत्या केली. त्याचा कारण पत्नीसोबत वेळ घालवण्यात अडचण ठरत होती. चिमुकली अशिरापर्यंत मोबाईलवर खेळत असल्याच्या रागातून ही हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात या हत्येचा उलगडा झाला असून वरळीवरून आरोपी इम्रान शेखला अँटॉप हिल पोलिसांनी अटक केली आहे.

पुढे आलेल्या माहितीनुर, चार वर्षांची चिमुरडी रोज रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर खेळात असायची. परिणामी इम्रान शेखला आपल्या पत्नीसोबत वेळ घालवण्यात अडचण येत होती. दरम्यान, हाच राग मनात ठेवून इमरानने अतिशय क्रूरपणे गळा आवळून चार वर्षीय चिमुलीची हत्या केली असल्याचे समोर आले. त्यांनतर हे कृत्य कुणाला कळू नये म्हणून मृतदेह कुलाबा येथील समुद्रात फेकला. मात्र दुसऱ्यादिवशी सकाळी ससून डॉकजवळ चिमुरडीचा मृतदेह सापडला. पोलिसांनी तपास सुरु करत चौकशी केली असता पोलिसांना संशय आला. मुलगी बेपत्ता झाली तेव्हापासून इमरान शेख देखील बेपत्ता असल्याने हा संशय अधिक बळावला. अखेर पोलीस तपासात सत्य बाहेर आलं आणि अँटॉप हिल पोलिसांनी वरळीवरून इमरान शेखला अटक केली. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. या संतापजनक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, परभी येथून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. एका महिलेने चक्क ट्रॅव्हल्समधून अर्भकाला रस्त्यावर फेकल्याची घटना घडली आहे. ही धक्कदायक घटना पाथरी येथील देवनांद्रा परिसरात पहाटेच्या सुमारास घडली आहे. ऋतिका ढेरे असे या महिलेचे नाव असून, तिचा साथीदार अल्ताफ शेख अशी दोन्ही आरोपींची नावं आहेत. पाथरी तालुक्यातील सेलू रोडवरील देवनांद्रा परिसरात ही घटना घडली. प्रवासी ट्रॅव्हल्समधून नवजात अर्भक रस्त्याच्या कडेला फेकून दिल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. ही घटना मंगळवारी (दि.१५) पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. डायल ११२ वर प्राप्त झालेल्या माहितीनंतर, पोलीस अंमलदारांनी तात्काळ सेलू रोडवरील देवनांद्रा परिसरात धाव घेतली. घटनास्थळी काळसर-निळसर रंगाच्या कपड्यात गुंडाळलेले नवजात अर्भक रस्त्याच्या कडेला आढळले.

दरम्यान, या ठिकाणी हजर असलेल्या नागरिकांनी अर्भक एका पांढऱ्या रंगाच्या ट्रॅव्हल्समधून फेकण्यात आले असून, गाडीवर संत प्रयाग ट्रॅव्हल्स असे नाव होते. ट्रॅव्हल्सची माहिती घेतली असता, संबंधित गाडी पुणे-परभणी व्हाया सेलू अशी सेवा करणारी असल्याचे निष्पन्न झाले. तपासात, प्रवासादरम्यान एका महिलेला प्रसूती वेदना झाल्या व ट्रॅव्हल्समध्येच प्रसूती झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर नवजात अर्भक नको असल्याने गाडीतून रस्त्यावर फेकल्याची कबुली संबंधित दोघांनी दिली. या प्रकारामुळे नवजात अर्भकाच्या जीवाला धोका निर्माण झाला असून, संबंधित दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अवैध सावकारांनी खरेदी खत करून घेतली असल्यास नागरिकांनी निर्भयपणे तक्रारी कराव्यात…

रांजणगाव गणपती : निर्मलग्राम ग्रामपंचायत रांजणगाव गणपती यांच्या वतीने तसेच सामाजिक कार्यकर्ते शिवाजी बबन खेडकर…

36 मिनिटे ago

अकरावीचे ऑफलाईन प्रवेश करणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयांवर कारवाईचा इशारा

मुंबई राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता ११ वीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेद्वारेच करणे बंधनकारक आहे. मंजूर…

3 तास ago

खासगी शिकवणी केंद्रांच्या कायद्याला १५ सप्टेंबरपर्यंत हरकतींची मुदतवाढ; आतापर्यंत ११ हजारांहून अधिक सूचना

मुंबई : महाराष्ट्र खासगी शिकवणी केंद्र (नोंदणी व विनियमन) अधिनियम, २०२६ च्या मसुद्यावर राज्यभरातून मोठ्या…

4 तास ago

गणेशोत्सव केवळ आरास-रोषणाईपुरता नको; समाजप्रबोधन आणि सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे; एकनाथ शिंदे

ठाणे : गणेशोत्सव केवळ देखावे, आरास आणि रोषणाईपुरता मर्यादित न राहता त्यातून समाजप्रबोधन, जनजागृती आणि सामाजिक…

4 तास ago

शिरुर तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; सात-आठ महिन्यांची गर्भवती असल्याचे वैद्यकीय तपासणीत उघड

शिरुर (तेजस फडके): अल्पवयीन मुलीला पैशांचे आमिष दाखवून तसेच धमकी देत तिच्यावर अत्याचार केल्याच्या आरोपाने…

14 तास ago

शिक्रापुर पोलिसांची स्थानिक गुन्हे शाखेसह धडाकेबाज कारवाई; महाराष्ट्र-मध्यप्रदेशात घरफोड्या करणारा सराईत चोर जेरबंद

तीन घरफोडीचे गुन्हे उघड, आरोपीविरुद्ध यापूर्वी १४ गुन्हे दाखल; १६ तोळे सोन्यासह २४ लाख ३०…

14 तास ago