मुंबई: अभिनेता रितेश देशमुखवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रितेशची सावली असलेल्या आणि अत्यंत जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. राजकुमार तिवारी असं त्यांचं नाव असून ते रितेशचे मॅनेजर होते.
राजकुमार तिवारी केवळ रितेशचे मॅनेजरच नव्हते तर त्याच्या मोठ्या भावासारखे होते. त्यामुळे त्यांच्या निधनाने रितेशला खूप मोठा धक्का बसला आहे. रितेशनं पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
रितेश देशमुखनं इन्स्टाग्रामवर राजकुमार तिवारी यांच्यासोबतचा एक फोटो पोस्ट केला. ज्याच्या कॅप्शनमध्ये त्यानं लिहलं, “राजकुमार तिवारी यांचे निधन झाल्याचं ऐकून मन सुन्न झालं असून मोठा धक्का बसला आहे. ते माझे मार्गदर्शक होते, माझे मोठे भाऊ, आणि माझं कुटुंबच होते. माझ्या पदार्पणापासून त्यांनी माझं काम हाताळलं आणि कठीण काळात कायम माझ्या सोबत ठामपणे उभे राहिले. मला तुमची कायम आठवण येईल तिवारीजी. त्यांचे कुटुंबीय विशेषतः त्यांची मुलं सिद्धार्थ आणि सुजीत यांच्याप्रती मी सहवेदना व्यक्त करतो”, या शब्दात रितेशनं दु:ख व्यक्त केलं.
रितेश देशमुखने बॉलिवूडमध्ये आपल्या करिअरची सुरुवात ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटातून केली होती. हा चित्रपट २००३ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात जिनिलिया डिसूझा हिची प्रमुख भूमिका होती. विशेष म्हणजे, त्याच वेळेपासून रितेशसोबत राजकुमार तिवारी हे मॅनेजर म्हणून कायम होते. मिळालेल्या माहितीनुसार, राजकुमार तिवारी यांनी बॉलिवूडमधील दिग्गज कलाकार विनोद खन्ना आणि फिरोज खान यांच्यासोबतही काम केलं होतं.
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…