अहिल्यानगर: हॉटेल्सवर देहविक्रीचा अवैध व्यवसाय चालविला जात असल्याचे समोर आले आहे. शिर्डीत देखील काही दिवसांपूर्वी हा प्रकार समोर आला होता. त्यानुसार शिर्डी शहरात वेश्या व्यवसायांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. यात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने शहरातील चार हॉटेल्स एक वर्षासाठी सील करण्यात आले आहे.
शिर्डीमध्ये काही दिवसांपूर्वी तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी हॉटेल्सवर पिटा अंतर्गत कारवाई केली होती. त्या कारवाई नंतर पोलिस प्रशासनाने न्यायालयात अहवाल सादर केला होता. या अहवालावरून न्यायालयाने निकाल देत ज्या ठिकाणी वेशाव्यवसाय सुरू होता. त्या आस्थापना सील करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी यांनी याबाबत आदेश काढले आहेत.
वर्षभरासाठी हॉटेल्स सील
दरम्यान ज्या ठिकाणी वेश्या व्यवसाय सुरु असल्याचे आढळून आले होते. त्यांना सील लावण्याचे आदेश काढण्यात आले आहे. त्यानुसार शिर्डी शहरातील हॉटेल साई वसंत विहार, हॉटेल शिर्डी साई इन, हॉटेल साई वीरभद्र आणि हॉटेल साई शीतल या हॉटेलवर कारवाई करत सदरचे हॉटेल्स एक वर्षासाठी सील करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.
अवैध धंद्याला लागणार चाप
शिर्डी शहरात अनेक ठिकाणी छुप्या पद्धतीने अवैध धंदा चालविला जात असल्याचे झालेल्या कारवाईमुळे उघडकीस आले आहे. यात चार हॉटेल्सवर कारवाई झाल्यामुळे खळबळ उडाली असून हॉटेल्स सील करण्यात आलेल्या कारवाईमुळे किमान हॉटेल्सवर चालविले जाणारे अवैध धंद्यांना काही दिवस तरी चाप बसणार आहे.
शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…
जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…
हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्याने…
पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…
गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…