महाराष्ट्र

सिल्व्हर रॉक्स, पुणे येथे डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या घरी श्री गणेशाची प्रतिष्ठापना

शेतकरी, महिला सुरक्षितता आणि राज्य-देशाच्या प्रगतीसाठी प्रार्थना

पुणे: गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर सिल्व्हर रॉक्स, मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर येथील निवासस्थानी महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि त्यांची भगिनी श्रीमती जेहलम जोशी यांनी श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली. जवळपास ५० वर्षांची ही परंपरा त्यांच्या आई-वडिलांनी – डॉ. दिवाकर गोऱ्हे व सौ. लतिका गोऱ्हे – यांनी सुरू केली होती आणि आजही ती भावपूर्णपणे पुढे नेली जात आहे.

या प्रसंगी घरातील आरास पर्यावरणपूरक ठेवण्यात आली होती. सोनेरी मोदकाद्वारे भारताच्या समृद्धीचे प्रतीक मांडले गेले, तर पाठीमागील धनुष्यबाण व त्रिशूलाच्या सजावटीतून सामर्थ्य आणि श्रद्धेचा संगम व्यक्त करण्यात आला. ही आरास केवळ सजावट नसून श्रद्धा, कृतज्ञता आणि प्रगतीची प्रार्थना असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

गणरायाच्या चरणी प्रार्थना करताना त्यांनी शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणाची मनोकामना केली. “या वर्षी पाऊस समाधानकारक झाला असला तरी काही भागांत शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. बळीराजाला सुख-समाधान मिळो, शेतीच्या उत्पादनास योग्य भाव मिळो आणि नवी उभारी घेण्यासाठी बाप्पाचे आशीर्वाद लाभोत. तसेच विद्यार्थी, महिला आणि कामगार यांचे जीवन सुजलाम-सुफलाम व्हावे,” असे त्यांनी नमूद केले.

महिलांच्या सुरक्षिततेवर भर देत डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, “‘लाडकी बहीण योजना’ ही महिलांच्या आर्थिक व सामाजिक सक्षमीकरणासाठी महत्त्वाची दिशा आहे. गावपातळीवर महिलांना सुरक्षितता, नेतृत्व आणि प्रगतीची संधी मिळावी, ही आमची गणरायाकडे प्रार्थना आहे.

राज्याच्या महायुती सरकारसाठी प्रार्थना करताना त्यांनी सांगितले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सर्वांगीण विकासाच्या मार्गावर आहे. या तिघा नेत्यांमध्ये कायम जिव्हाळा , मैत्री आणि सलोखा टिकून राहावा, जेणेकरून ते एकसंघपणे कार्य करून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू शकतील.” त्याचबरोबर, केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताला जागतिक पातळीवर प्रगती व सामर्थ्य प्राप्त होवो, अशीही त्यांनी प्रार्थना केली.गणरायाच्या आगमनानंतर लवकरच गौरी पूजनाचा मंगल सोहळा होणार असून कौटुंबिक ऐक्य आणि समाजातील स्त्रीशक्तीचे प्रतीक म्हणून तो साजरा केला जाणार आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

4 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

10 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

10 तास ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

11 तास ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

11 तास ago

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वसूल केलेली रक्कम परत द्या; चंद्रकांत पाटील

पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना; २०२६-२७ पासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करणार मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील…

11 तास ago