शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत सध्या दिवसेंदिवस वेगवेगळ्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढतच असुन गुन्हेगारांना कायद्याचा बिलकुल धाक राहिलेला नाही. शिरुर शहरात सहा वर्षीय चिमुरडीवर अत्याचार झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा शिरुर तालुक्यात चौदा वर्षीय मुलीवर वारंवार झालेल्या अत्याचाराने मुलगी गरोदर राहिल्याची घटना घडली असुन याबाबत शिरुर पोलीस ठाण्यात रतीलाल चून्या कुवर याचे विरुद्ध बलात्कार सह बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रांजणगाव सांडस (ता. शिरूर) येथे राहणारी पीडित चौदा वर्षीय मुलगी ही तिच्या घरी असताना रतीलाल कुवर हा सदर मुलीला घरात बोलावून घेत बळजबरीने तिच्यावर अत्याचार करत होता. घडलेला प्रकार कोणास सांगितला तर तुला जीवे मारेल अशी धमकी देखील रतिलाल पीडित मुलीला देत होता. मात्र घडलेल्या प्रकारानंतर मुलीने घाबरून कोणासही काही सांगितले नाही मात्र मुलीच्या पोटात अचानक दुखू लागल्याने मुलगी गरोदर असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर मुलीच्या आईने मुलीला विश्वासात घेत विचारपूस केली असता मुलीने घडलेला प्रकार सांगितला.
या घडलेल्या प्रकाराबाबत पीडित मुलीच्या आईने शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असुन शिरूर पोलिसांनी रतीलाल चून्या कुवर सध्या (रा. रांजणगाव सांडस, (ता. शिरूर), जि. पुणे, मुळ रा. वालापागण ता. साक्री जि. धुळे) याच्यावर पोक्सोसह बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्नेहल चरापले करत आहेत.
पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…
आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…
सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…
धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…
लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…
पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…