क्राईम

शिरुर तालुक्यातील त्या कंपनीत आम्हाला माथाडी कामगारांचा ठेका द्या नाहीतर…

सणसवाडीत कंपनीकडून खंडणी घेणारे दोघे जेरबंद 

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथील एका कंपनीत व्यवस्थापकाला धमकी देत माथाडी कामगारांचा ठेका मागून ठेका द्या अन्यथा कंपनी बंद पाडू असे म्हणून खंडणी मागणाऱ्या दोघांवर शिक्रापूर पोलिसांनी गुन्हे दाखल करत राजू मनोहर दरेकर व निखील नामदेव खेंगत या 2 खंडणीखोरांना अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांनी दिली आहे.

सणसवाडी (ता. शिरुर) येथील एसबीएस इलेक्ट्रोप्लेटर्स आणि वरनादा इंडस्ट्रीज प्रायवेट लिमिटेड यांना कंपनीमध्ये राजू दरेकर व निखील खेंगट या दोघांनी नोव्हेंबर २०२२ मध्ये कंपनी मध्ये वारंवार जाऊन कंपनीचे व्यवस्थापक दयानंद तिवारी यांना भेटून आम्हाला कंपनीमध्ये माथाडी कामगारांचा ठेका द्या, नाहीतर महिन्याला 33 हजार रुपये द्या, असे म्हणत शिवीगाळ, दमदाटी करत जीवे मारुन कंपनी बंद पाडण्याची धमकी दिली. त्यानंतर वारंवार दोघेजण कंपनीमध्ये येऊन धमकी देत असल्याने तिवारी घे घाबरून गेल्याने त्यांनी 2 महिन्याचे 66 हजार रुपये निखील खेंगट याच्या खात्यावर पाठवले. त्यानंतर पुन्हा दोघे त्रास देत असल्याने तिवारी यांची कंपनीचे मालक प्रकाश भट्ट यांच्याशी चर्चा केली.

याबाबत कंपनीचे व्यवस्थापक दयानंद रामसकल तिवारी (वय ५९) रा. सणसवाडी ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी राजू मनोहर दरेकर (वय २६) रा. सणसवाडी (ता. शिरुर) जि. पुणे व निखील नामदेव खेंगट (वय २८) रा. पारोडी (ता. शिरुर) जि. पुणे या दोघांवर गुन्हे दाखल करत दोघांना देखील अटक केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे हे करत आहे.

औद्योगिक वसाहतीमध्ये कोणत्याही कंपनी अथवा कंत्राटदारांना कोणी त्रास देऊन, धमकावून खंडणी मागत असेल तर त्यांनी शिक्रापूर पोलिसांत तक्रार द्यावी अथवा ९०७७१००१०० या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांनी केले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अष्टविनायक यात्रा म्हणजे श्रद्धा, इतिहास आणि निसर्गाचा अनोखा संगम; जाणून घ्या आठही गणरायांचे महत्त्व

Pपुणे : महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेत अष्टविनायक यात्रेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्रीगणेशाची आठ…

2 मिनिटे ago

धनुष्यबाण गोठवण्याची मागणी करणाऱ्यांवर शिंदेंची खरमरीत टीका; ‘उबाठा’वर निशाणा

नवी दिल्ली: “बाळासाहेब ठाकरे यांना धनुष्यबाण प्राणाहून प्रिय होता. ते देव्हाऱ्यात धनुष्यबाणाची पूजा करायचे. मात्र, २०१९…

46 मिनिटे ago

राज्यभरात २९ सप्टेंबरला ‘रोजगार महाकुंभ’; महाविद्यालयांनी पुढाकार घ्यावा; चंद्रकांत पाटील

मुंबई: राज्यातील युवक-युवतींना त्यांच्या शैक्षणिक पात्रता, कौशल्ये आणि क्षमतेनुसार रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी…

49 मिनिटे ago

युद्धजन्य परिस्थितीतही भारताची अर्थव्यवस्था ७.८ टक्के दराने वाढतेय; एकनाथ शिंदे

ठाणे : जगातील अनेक देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली असताना आणि त्याचा विविध अर्थव्यवस्थांवर परिणाम…

57 मिनिटे ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून सपकाळांचा सरकारवर हल्लाबोल

नाशिक : आदिवासी विद्यार्थी गेल्या १५ ते २० दिवसांपासून विविध मागण्यांसाठी उपोषण आणि आंदोलन करत…

1 तास ago

वरळीत कचरा अन् दुर्गंधीचे साम्राज्य; शिवसेना ॲक्शन मोडवर, वर्षभर ‘स्वच्छ वरळी’ अभियान

मुंबई : स्थानिक आमदारांच्या दुर्लक्षामुळे वरळी परिसरात कचरा आणि दुर्गंधीचे साम्राज्य पसरल्याचा आरोप करत शिवसेनेने…

1 तास ago