मुख्य बातम्या

किरकोळ कारणावरून सख्ख्या चुलत भावाचा खून करणाऱ्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील खंडाळे गावातील येथे पाच वर्षापूर्वी किरकोळ कारणावरून सख्या चुलत भावाचा खून करणाऱ्या आरोपीला पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली असुन विकास बबन खेडकर (वय ५८, रा खंडाळे खेडकर मळा ता शिरूर जि पुणे) असे शिक्षा ठोठाविण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. न्यायाधीश एस आर नांवदर यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले आहेत. याप्रकरणी प्रकाश यांचे वडील मच्छिंद्रनाथ सिताराम खेडकर (वय ७०, सेवानिवृत्त सहाय्यक फौजदार, रा. खंडाळे, खेडकर मळा, ता. शिरूर जि पुणे) यांनी रांजणगांव पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिरुर तालुक्यातील खंडाळे या गावातील प्रकाश मच्छिंद्रनाथ खेडकर (वय ३४, रा. खंडाळे ता. शिरुर) या व्यक्तीचा खुन झाला होता. फिर्यादी मच्छिंद्रनाथ खेडकर हे मयत प्रकाश यांचे वडील असुन ते 2007 साली पुणे शहर दलातून सहाय्यक फौजदार या पदावरुन सेवानिवृत्त झाले आहेत. आरोपी विकास खेडकर आणि प्रकाश खेडकर हे दोघे नात्याने चुलत भाऊ आहेत. प्रकाश याचे रेखा यांच्यासोबत लग्न झाले असुन त्यांना दुर्वा व आरव असे दोन मुले आहेत. मुलगा प्रकाश आणि रेखा यांच्यात वारंवार वाद होत होते. त्यामुळे सून रेखा मुलांना घेऊन शिक्रापूर येथे माहेरी गेली होती.

दरम्यान 21 डिसेंबर 2017 रोजी मयत प्रकाश खेडकर हा चुलत भाऊ विकास खेडकर यांच्याकडे रात्री सव्वा दहाच्या सुमारास वाजण्याच्या घरी गेला आणि तुझ्यामुळे माझा संसार मोडला. माझी पत्नी माझे सोबत राहत नाही. असे म्हणून प्रकाश हा विकास सोबत वाद घालू लागला. तेंव्हा विकास याने त्यास समजावण्याचा प्रयत्न केला परंतू प्रकाश हा ऐकत नव्हता.

त्यामुळे या सततच्या वादाला कंटाळून आरोपी विकासने प्रकाशला डोळयात मीरची पावडर टाकली आणि पायावर लोखंडी अँगलने मारहाण केली. तसेच प्रकाश खाली पडल्यानंतर त्याच्या डोक्यात दगड मारून त्यास जखमी केले. तेव्हा प्रकाशच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी मच्छिंद्रनाथ खेडकर यांनी रांजणगांव पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. रांजणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपी विकास खेडकर याला अटक केली होती.

सदर गुन्ह्याचा खटला पुणे जिल्हा सत्र न्यायालयात सुरु होता. या खटल्यात सरकारी वकील संतोषकुमार पताळे यांनी न्यायालयात केलेले युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीस जन्मठेपेची शिक्षा आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा आणि दंड न भरल्यास तीन महिने शिक्षा ठोठाविली आहे. तसेच दंड न भरल्यास तीन महिन्याची शिक्षा ठोठाविली आहे. हे आदेश न्यायाधीश एस आर नांवदर यांनी दिले आहेत. दरम्यान, या खटल्यात सरकारी वकील संतोषकुमार पताळे यांना रांजणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बळवंत मांडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडेपाटील, अमोल गोरे, सहाय्यक फौजदार विद्याधर निचीत, विशाल गव्हाणे आणि मुस्ताक शेख यांची मदत मिळाली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर पोलिसांच्या डि बी पथकाची धडाकेबाज कामगिरी; दोन म्हशी, दोन बैल आणि पिकअप वाहन असा ५ लाख ६० हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलीस स्टेशन हद्दीत पशुधन चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात शिरुर पोलिसांच्या…

5 तास ago

शिरुर शहरात नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांना पोलिसांचा दणका; २५७ केसेस, तब्बल ३ लाख ५९ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल

शिरुर (तेजस फडके): वाहन चालविताना वाहतूक नियमांचे पालन करणे हि प्रत्येक चालकाची जबाबदारी असते. मात्र…

5 तास ago

सावधान, ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, या आजारांचा धोका

पूर्वीच्या काळी लोक अशी कामं करत असत ज्यात शरीराला जास्त मेहनत करावी लागत असे. पण…

13 तास ago

घसा सारखा खवखवतो, सतत घशात इन्फेक्शन? ५ उपाय, आजारी झोपून राहाव लागणार नाही

घसा खराब होणे, सोलवटल्यासारखे वाटणे आणि खाताना त्रास होणे हे अनेकदा बदलत्या हवामानामुळे, गरम-थंड पदार्थ…

13 तास ago

हृदयविकार काही घरगुती उपाय

आहार: सकाळचा नाश्ता: फळे, भाज्या, कडधान्ये आणि कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश करा. मीठाचे…

13 तास ago

‘लेबल खोटं बोललं तरी ग्राहकाला किंमत मोजावी लागते’; तुकाराम मुंढेंचा भेसळखोरांना सज्जड इशारा

मुंबई : अन्न आणि औषध प्रशासनाच्या (FDA) धडाकेबाज कारवाईमुळे राज्यातील भेसळखोर आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या…

13 तास ago