पुणे: पुण्यामध्ये एका व्यक्तीने आपल्या सख्ख्या पुतण्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चुलतीला आय लव्ह यू म्हणाल्यामुळे संतापलेल्या चुलत्याने तरुणाला संपवलं.
पुण्यातील चंदनगरमध्ये ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चुलतीला आय लव यू म्हणाल्याने चिडलेल्या पुतण्याने तरुणाची हत्या केली. पुण्यातील चंदननगर परिसरातील आंबेडकर वसाहतीमध्ये ही धक्कादायक घटना घडली. साईनाथ उर्फ खलीबली दत्तात्रय जानराव (वय ३५ वर्षे) असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. सोन्या उर्फ आदित्य संतोष वाल्हेकर आणि समर्थ उर्फ पप्पू शर्मा यांनी साईनाथची हत्या केली.
साईनाथने त्याच्या चुलतीला आय लव्ह यू म्हणत छेड काढली. याचाच राग आल्यामुळे संतोष आणि पप्पू या दोघांनी साईनाथला हॉकी स्टिकने बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या साईनाथचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपी फरार झाले होते. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत साईनाथचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. त्यानंतर चंदननगर पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. पोलिस सध्या या प्रकरणाच तपास करत आहेत.
कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…
शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…
पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…
माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…
पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना; २०२६-२७ पासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करणार मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील…