मुख्य बातम्या

शिरुर; कर्ज पाच लाखांचे, व्याजापोटी उकळले ४ लाख २० हजार; तरीही सावकाराचा पैशांसाठी तगादा

शिरुर (तेजस फडके) गरजवंताच्या आर्थिक अडचणीचा फायदा उठवून त्याला व्याजाच्या जाळ्यात अडकवायचे, अवाच्या सव्वा व्याज वसूल करायचे आणि पैसे दिल्यानंतरही वसुलीचा तगादा लावायचा, असा संतापजनक सावकारीचा प्रकार शिरुर शहरात समोर आला असुन व्यवसायासाठी घेतलेल्या पाच लाख रुपयांच्या कर्जापोटी दोन महिन्यांत तब्बल ४ लाख २० हजार रुपये दिल्याचा दावा करणाऱ्या तरुण व्यावसायिकाला अद्यापही पैशांसाठी धमकावले जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. 

अरबाज नासिर बागवान (वय ३०, रा. भाजीबाजार, शिरुर) या तरुणाने याप्रकरणी शिरुर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार अर्ज दाखल केला आहे. तक्रारदाराच्या अर्जानुसार, गोलेगाव येथील अनिल घेगडे यांच्याकडून त्यांनी ऑगस्ट महिन्यात हॉटेल व्यवसायासाठी ५ लाख रुपये घेतले होते. या रकमेवर दरमहा तब्बल २० टक्के व्याज आकारण्याचे ठरल्याचा आरोप आहे. म्हणजे ५ लाखांच्या कर्जावर दरमहा १ लाख रुपये व्याज हा आकडा पाहिल्यानंतर या व्यवहाराचे गांभीर्य लक्षात येते.

धक्कादायक बाब म्हणजे, तक्रारदाराने २ महिन्यांत दररोज ७ हजार रुपये याप्रमाणे ४ लाख २० हजार रुपये व्याज दिल्याचे अर्जात नमूद केले आहे. तरी देखील या सावकाराची पैशांची मागणी थांबली नाही. त्यानंतर एक दिवसाची रक्कम थकल्यास ३५० रुपये दंड आकारुन वसुली केली जात असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

कर्ज दिले की आर्थिक पिळवणुकीचा परवाना मिळतो का…?

या सावकाराने फोन करुन, घरी आणि हॉटेलवर येऊन पैशांसाठी तगादा लावणे, स्वतःसह इतर व्यक्तींमार्फत दबाव आणणे, शिवीगाळ आणि धमक्या देणे असे प्रकार होत असल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. इतकेच नव्हे तर कुटुंबीयांनाही धमकावले जात असल्याने जीवितासह मालमत्तेच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणात संबंधित व्यक्तीकडे सावकारी व्यवसायाचा वैध परवाना आहे की नाही, याचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

आता पोलिसांनी केवळ अर्ज स्वीकारुन फाईल बंद करु नये…

तक्रारदाराने २७ नोव्हेंबर २०२६ रोजी याबाबत तक्रार अर्ज दिला असुन शिरुर पोलिसांनी तातडीने चौकशी करत महाराष्ट्र सावकारी अधिनियमानुसार कारवाई करावी अन तक्रारदाराच्या कुटुंबीयांना पोलीस संरक्षण आणि गुन्हा निष्पन्न झाल्यास एफआयआर (FIR) दाखल करण्याची मागणी केली आहे.

सामान्य माणसाला कर्जाच्या नावाखाली आर्थिक आणि मानसिक छळ सहन करावा लागत असेल, तर कायद्याचा धाक नेमका कोणाला आहे…? सावकारीच्या या कथित जाळ्याची पाळेमुळे शोधून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे हि पोलिसांची जबाबदारी आहे. अन्यथा तक्रारींचे कागद वाढतील; पण सावकारीच्या दहशतीला कधीही आळा बसणार नाही. 

(क्रमश:)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

डिलिमिटेशन विधेयकावर काँग्रेसचा आक्रमक पवित्रा

महिला आरक्षणाच्या नावाखाली मतदारसंघांची फेररचना नको; महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप…

19 तास ago

घोळूची भाजी म्हणजे शेतातील सोन्याची खाण

पर्स्लेन (पोर्टुलाका ओलेरेसिया) ही एक पानेदार हिरवी वनस्पती आहे जी बहुतेक वेळा तण मानली जाते…

20 तास ago

साखर आरोग्यास अपायकारक

साखर तयार करण्याचा सर्वांत पहिला कारखाना भारतात इंग्रजांनी सन १८६८ मध्ये सुरु केला. त्याआधी भारतीय…

20 तास ago

राज्यातील १२३ शिक्षकांना ‘क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार’ जाहीर

३ डिसेंबरला मुंबईत होणार पुरस्कार वितरण; प्राथमिक, माध्यमिकसह विविध प्रवर्गांतील शिक्षकांचा समावेश मुंबई: राज्यातील शैक्षणिक…

20 तास ago

दुष्काळग्रस्तांच्या मुलांचे शिक्षण आणि मुलींच्या विवाहाची जबाबदारी शिवसेना घेणार; एकनाथ शिंदेंची ग्वाही!

इंगळे कुटुंबासोबत भाकरी खात शेतकऱ्यांच्या व्यथा जाणल्या; कर्जवसुलीसाठी धमकावणाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश मेहकर : दुष्काळग्रस्त…

20 तास ago

गावठी पिस्तूल अन् जिवंत काडतुसासह आरोपी जेरबंद!

शिरूर पोलिसांच्या डी.बी. पथकाची धडाकेबाज कारवाई; बालाजी मोटे यांच्या गोपनीय माहितीने आरोपी जाळ्यात! शिरूर (अरुणकुमार…

20 तास ago