क्राईम

केंदुरमध्ये विद्युत पंप चोरट्यांच्या हैदासाने शेतकरी हैराण…

शिक्रापूर (शेरखान शेख): केंदुर (ता. शिरुर) येथील शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत पंप चोरुन नेण्याच्या अनेक घटना घडत असल्याने चोरट्यांचा हैदास मजल्याचे दिसत असल्याने शेतकरी हैराण झाले असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

केंदुर (ता. शिरुर) येथील शेतकऱ्यांनी शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी विहिरीवर विद्युत पंप बसवलेले आहेत. नेहमीप्रमाणे शेतातील पिकांना पाणी देऊन शेतकरी घरी गेलेले असताना भाऊसाहेब मिडगुले शेतात गेलेले असताना त्यांना शेतातील विद्युत पंप व साठ फूट केबल चोरीला गेल्याची दिसून आली.

तसेच दादाभाऊ साकोरे हे शेतात गेले असता त्यांना शेतातील विद्युत पंप व 45 फूट केबल चोरीला गेल्याची दिसून आली. त्याचप्रमाणे फक्कड थिटे हे देखील शेतात गेले असता त्यांना शेतातील विद्युत पंप चोरीला गेल्याचे दिसून आले. त्यामुळे शेतातील विद्युत पंप अज्ञात चोरट्यानी चोरुन नेल्याचे लक्षात आले.

याबाबत भाऊसाहेब दगडू मिडगुले, दादाभाऊ बाळू साकोरे व फक्कड गणपत थिटे तिघे रा.केंदुर (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे स्वतंत्र फिर्यादी दिल्या असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय चौधर व पोलीस नाईक गणेश सुतार हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही!’दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजारांची अग्रीम मदत

पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला…

3 तास ago

‘फ्लॅट नव्हे, ग्राहकांचा विश्वास जिंकणारे शहर उभारा!’ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विकासकांना आवाहन

पुणे: “घर म्हणजे केवळ फ्लॅट नव्हे, तर प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते. त्यामुळे विकासकांनी केवळ इमारती…

3 तास ago

किरण सरनाईक यांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे उद्या अमरावतीत

शिक्षक मतदारसंघात महायुतीची ताकद दाखवणार; जाहीर सभेकडे राज्याचे लक्ष मुंबई: विधान परिषद निवडणुकीच्या प्रचाराला वेग…

3 तास ago

मराठवाड्याचा आवाज बुलंद करण्यासाठी सतीश चव्हाण यांना विजयी करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

बीड: मराठवाड्याच्या विकासाची लढाई ही एका दिवसाची नसून, त्यासाठी अनुभवी, अभ्यासू आणि सातत्याने काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींची…

3 तास ago

दुष्काळात भाजपची इव्हेंटबाजी; गरबा आणि महानाट्यावर कोट्यवधींच्या खर्चाचा आरोप

अतुल लोंढे यांचा हल्लाबोल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित नेत्यांचे राजीनामे घेण्याची हिंमत दाखवावी मुंबई :…

4 तास ago

एसआरएतील अनियमिततेप्रकरणी विकासकांवर कारवाई; रॉयल पामच्या विकासकाविरोधात गुन्हा दाखल

खासदार रवींद्र वायकर यांच्या बैठकीत २७ प्रलंबित प्रकल्पांचा आढावा; भगतसिंग नगरमधील विकासकावर निष्कासनाची कारवाई मुंबई…

9 तास ago