क्राईम

शिरुर तालुक्यात संस्थेतील लोकांना 10 गुंठे जागा देतो असे सांगून १ कोटी ६ लाखांची केली फसवणूक

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथील माऊली सहकारी गृहरचना संस्था मर्यादित या संस्थेतील लोकांना 10 गुंठे जागा देतो, असे सांगून त्यांच्याकडून 1 कोटी 6 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शिरुर पोलिस स्टेशन येथे 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परेश नागनाथ सुपते, दत्तात्रय सिध्दु आढाव, संजय मच्छिंद्र गटकळ, नामदेव सिताराम गावडे सर्व रा. शिरूर (ता. शिरूर) जि. पुणे यांच्यावरच फसवणुक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सतिश रामदास आंधळे (रा. शिरूर) यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे तरी ता. 10/12/2020 रोजी पासुन आज पर्यंत शिरूर गावचे हददीतील वरील 4 आरोपींनी संगणमत करून फिर्यादीला शिरुर नगरपालीका हददीतील सर्व्हे नं. 54 मधील 10 गुंठे जागा खरेदीखताने खरेदी करून देतो, असे म्हणुन विसारपावती करुन देउन त्यांच्याकडुन विश्वासाने 1 कोटी 6 लाख रूपये घेऊन ते त्यातील काही पैसे जागेचे मुळ मालक गायत्री संतोष पटवा यांचे खात्यावर टाकुन ते कागदावर सापडु नये म्हणुन गायत्री पटवा यांचे खात्यावरून गायत्री पटवा यांच्याभोळेपणाचा फायदा घेऊन ते पैसे सुपते याचे ओळखीच्या लोंकाचे अकाउंटला खोटे कारण सांगुन टाकुन ते पैसे रोख स्वरूपात सुपते व इतर लोकाकडुन स्विकारून जागेचे खरेदीखत करून न देता माउली सहकारी गृहरचना संस्था मर्या शिरूर या मधील सभासदांची अशी जमा झालेल्या रक्कमेतील दिलेल्या 1 कोटी 6 लाख रूपयाचा अपहार करून शिरूरच्या गृहरचना संस्था मधील सभासदाची फसवणुक केली आहे.

याप्रकरणी 4 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून गुन्हयाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अभिमन्यू पवार हे करत आहेत

शिरूर तालुका टीम

Recent Posts

इम्यूनिटी बुस्ट करण्यासाठी स्वयंपाकघरातील ‘या’ गोष्टींपासून तयार करा काढा

पावसाळ्यात पावसामुळे निसर्ग मस्त हिरवेगार बनते, त्यासोबतच उन्हाळ्यानंतर आपल्याला मानसिक शांतीही मिळते. पण त्याचबरोबर पावसाळ्यात…

6 तास ago

रोज रात्री पायाला तेलानं मालिश करा, तब्येत कायमची सुधरवून टाकणारा पाहा सोपा उपाय

तब्येत सांभाळण्यासाठी लोकांना पुरेसा वेळ मिळत नाही. पण अनेकांना हे माहीत नसतं की, आयुर्वेदात अशा…

6 तास ago

लहान मुलांसह त्यांच्या आईबाबांचाही ब्रेन रॉट नावाचा आजार कसा ओळखाल

खूप मोबाईल किंवा टीव्ही पाहतात म्हणून फक्त लहान मुलांनाच दोष देऊन उपयोग नाही. कारण त्यांच्या…

6 तास ago

४० कोटींच्या कथित कर्ज घोटाळा प्रकरणात अरविंद पाटील निलंगेकरांना दिलासा नाही

दोषमुक्तीचा अर्ज उच्च न्यायालयाकडून फेटाळला नाशिक: युनियन बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या…

7 तास ago

शिक्षकांच्या प्रश्नांना सरकारचे प्राधान्य; सरनाईक यांच्या विजयासाठी शिंदेंचे आवाहन

अमरावती: शिक्षकांच्या प्रश्नांना सरकार प्राधान्य देईल आणि महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांनी वचननाम्यात दिलेली आश्वासने…

7 तास ago

संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी निर्भीडपणे संघर्ष करावा; विजय वडेट्टीवार

अमरावती: देशातील लोकशाही व्यवस्था, भारतीय संविधान आणि बहुजन समाजाचे अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी निर्भीडपणे…

7 तास ago