मुख्य बातम्या

श्री क्षेत्र रांजणगाव गणपती ट्रस्ट तर्फे कर्मचारी महिलांच्या हस्ते आरती करुन महिलादिन साजरा

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): आपल्या संस्कृतीमध्ये मुळातच पुर्वीपासूनच महिलांना देवी आणि मातेचे स्थान दिलेले आहे. मात्र परदेशात महिलांना अतिशय हीन वागणुक दिली जात होती. तसेच त्यांना मतदानाचा ही अधिकार नव्हता. म्हणुन त्यांनी याविरुद्ध एकजुटीने लढा दिला आणि त्यात त्यांचा विजय झाला म्हणुन 8 मार्च हा संपुर्ण विश्वात जागतिक महिला दिन म्हणुन साजरा केला जातो, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या विभावरी देव यांनी केले.

श्री क्षेत्र रांजणगाव देवस्थान ट्रस्टच्या वतीने आज ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त अध्यक्षा स्वाती पाचुंदकर पाटील यांच्या संकल्पनेतील दुसरी महाआरती आणि त्या महाआरतीचे मानकरी म्हणून देवस्थान मधील सर्व सेवेकरी महिला यांच्या हस्ते सकाळी 7:30 वाजता आरती करण्यात आली. तसेच या सर्व महिलांना त्यांच्या सेवेबद्दल शाल, श्रीफळ आणि साडीचोळी देऊन गौरवण्यात आले. तसेच कारेगावच्या ग्रामपंचायत सदस्या प्रियांका गवारे यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.

यावेळी देवस्थानचे मुख्य विश्वस्त ओंकार देव, उपाध्यक्ष संदीप दौडकर, सरस्वती पाचुंदकर पाटील, पोलिस पाटील सारिका पाचुंदकर , विभाताई देव, सुमन हगवणे, अनिता वाळके, वर्षा पाचुंदकर पाटील, रुपाली देव, श्रुती हगवणे, मेघना गवारे, सेवेकरी, माता-भगिनी, भाविक भक्त तसेच आसपासच्या परिसरातील अनेक महिला उपस्थित होत्या.
समाजातील प्रत्येक महिला हि घराची सगळी जबाबदारी पार पाडून कामासाठी बाहेर पडत असते. आमच्या देवस्थान मधील सर्व सेवेकरी महिला या निस्वार्थी काम करतात. त्यामुळे त्यांना आज जागतिक महिला दिनानिमित्त आम्ही महाआरतीचा मान दिला.

स्वाती पाचुंदकर (अध्यक्षा)

श्री क्षेत्र रांजणगाव गणपती ट्रस्ट 

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

4 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

1 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

1 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

1 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

1 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

1 दिवस ago