क्राईम

निष्पाप मुलींवर केला सामूहिक बलात्कार…

दिल्ली: राजधानी दिल्लीतून माणुसकीला काळीमा फासणारी एक बातमी समोर आली आहे. दिल्लीतील नरेला परिसरात दोन निष्पाप मुलींवर सामूहिक बलात्कार झाल्याचं संतापजनक वृत्त समोर आलं आहे.

नरेलामधील एका खाजगी मालमत्तेवर बांधण्यात आलेल्या स्विमिंग पूलजवळ दोन 9 वर्षीय मुलींवर दोन व्यक्तींना सामूहिक बलात्कार केला. दोन आरोपींपैकी एक कंत्राटदार, तर दुसरा स्विमिंग पूलचा केअरटेकर असल्याची माहिती आहे.

निष्पाप मुलींवर सामूहिक बलात्कार

दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, प्रकरणातील आरोपी हे दोन्ही पीडित मुलींच्या शेजारी राहत असल्याचं समोर आलं आहे. एके दिवशी दोन्ही मुलींना एका बहाण्याने स्विमिंग पूलजवळील परिसरात नेण्यात आलं. आरोपीची ओळख 37 वर्षीय अनिल कुमार आणि 24 वर्षीय मुनील कुमार असल्याचं सांगण्यात येत आहे. अनिल उत्तर प्रदेश तर मुनील बिहारचा रहिवासी असल्याची माहिती समोर आली. दोन्ही आरोपींनी अल्पववयीन आणि निष्पाप मुलींवर बलात्कार केला आणि त्यानंतर दोघींनाही याबद्दल कोणालाही न सांगण्याची धमकी दिली.

आईने केली तक्रार दाखल

प्रकरणातील एका पीडितेने आपल्या आईला घडलेल्या घृणास्पद घटनेबद्दल सांगितलं असता हे धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं. 8 ऑगस्ट रोजी संबंधित पीडितेच्या आईने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांकडे तक्रार करताना संबंधित महिलेने तिची मुलगी आणि तिच्यासोबत असलेल्या एका दुसऱ्या मुलीवर नरेलमधील एका स्विमिंग पूल परिसरात बलात्कार करण्यात आल्याचा आरोप केला. याप्रकरणी नरेला पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 70(2) (सामूहिक बलात्कार), 127 (चुकीच्या पद्धतीने कोंडून ठेवणे) तसेच 351 (गुन्हेगारी धमकी) आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्याच्या कलम 6 आणि 10 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिली माहिती

यानंतर, पीडित मुलींचे जबाब नोंदवण्यात आले आणि तक्रारीची पुष्टी करण्यात आली. पोलिसांनी मुलींच्या जबाबाच्या आधारे आरोपी अनिल आणि मुनीलला अटक केल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांना आरोपी मागील कोणत्याही गुन्हेगारी गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचे कोणतेही पुरावे सापडले नाहीत. एका पोलीस अधिकाऱ्याने प्रकरणाची माहिती देताना सांगितलं की, स्विमिंग पूल परिसरातील गेट उघडलेला आढळल्यानंतर मुलींचा एक ग्रुप संबंधित परिसरात घुसला होता. दोन्ही आरोपींनी मुलींना पाहिले आणि चलाखीने त्यापैकी दोन मुलींना पूल पासून दूर नेले आणि त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

5 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

11 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

11 तास ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

12 तास ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

12 तास ago

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वसूल केलेली रक्कम परत द्या; चंद्रकांत पाटील

पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना; २०२६-२७ पासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करणार मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील…

12 तास ago