मुख्य बातम्या

अँजिओप्लास्टी झालेल्या शिक्षकांना बदलीत सवलत नसतानाही नियमबाह्यरिता दिला विशेष लाभ

शिरूर (अरुणकुमार मोटे): राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत यंदा ‘हृदयाचा’ मुद्दा तापला आहे. अँजिओप्लास्टी झालेल्या शिक्षकांना बदलीत सवलत न देण्याचा नियम असतानाही पुणे जिल्हा परिषदेसह अनेक जिल्हा परिषदांनी तो नियम पायदळी तुडवला आहे . यामुळे संवर्ग ४ मधील शिक्षकांचे मन सुन्न झाले असून, संपूर्ण बदली प्रक्रिया नियमाप्रमाणे पुन्हा राबवावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे

ग्रामीण विकास विभागाने जारी केलेल्या परिपत्रकात स्पष्ट शब्दांत नमूद आहे की, “बायपास, ओपन हार्ट, इम्प्लांट यांसारख्या गंभीर हृदयशस्त्रक्रियांना सवलत; अँजिओप्लास्टीला नाही!”यामागे न्यायालयीन निकालाचा आधार घेण्यात आला आहे, ज्यात अँजिओप्लास्टीला शस्त्रक्रियेच्या प्रकारात न धरल्याचे म्हटले आहे. तरीही, अनेक जिल्हा परिषदांनी बदली प्रक्रियेत या शिक्षकांना ‘विशेष लाभ’ दिला, हे उघड झाले आहे.

अँजिओप्लास्टी झालेल्या शिक्षकांच्या भावना मात्र उफाळून आल्या आहेत. “हृदयविकाराचा झटका बसल्यानंतरच अँजिओप्लास्टी करावी लागते. चार-पाच स्टेंट टाकले तरी हृदय पूर्वीसारखे राहत नाही, मग आम्हाला सवलतीबाहेर का ठेवावे?” असा संतप्त सवाल एका शिक्षकाने केला आहे. “या निर्णयामुळे छातीत कळ येतेय!” असाही सूर शिक्षकांमधून ऐकावयास मिळत आहे

यंदाच्या बदल्यांमध्ये पदोन्नती, संचमान्यता, समानीकरण आणि अतिरिक्त शिक्षक यांसारख्या सगळ्याच मुद्द्यांवर गोंधळ उडालेला आहे. न्यायालयीन खटले सुरू असून, ३१ मेपूर्वी बदल्या पूर्ण करण्याचा शासन आदेश हवेतच विरला आहे. शैक्षणिक वर्ष सुरू असताना अचानक बदल्यांचा घाट घालण्यात आल्याने विद्यार्थ्यांचेही नुकसान होत असल्याची खंत व्यक्त केली जात आहे.

चुकीचा लाभ दिल्याने संवर्ग ४ मधील शिक्षकांवर मोठा अन्याय होत आहे. ते ३-५ वर्षे दूरवर हलवले जाणार असून, यातून वैयक्तिक, कौटुंबिक आणि शैक्षणिक अडचणी वाढणार आहेत. त्यामुळे शासनाने तातडीने प्रक्रियेतील नियमानुसार त्रुटी दुरुस्त करून योग्य पद्धतीने पारदर्शी बदल्या राबवाव्यात, चुकीच्या पद्धतीने नियमबाह्य बदल्या केल्याने कारवाई करण्याची मागणी शिक्षक वर्गातून होत आहे.

(क्रमशः )

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

7 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

15 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

3 दिवस ago