शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील बजरंगवाडी येथे हॉटेल तोरणा समोरुन रस्ता ओलांडणाऱ्या मन्सूर निजाम सय्यद या इसमाला मद्यधुंद अवस्थेत आलेल्या टेम्पो चालकाच्या टेम्पोची धडक बसून त्याचा जागीच मृत्यू झाला असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गंगाधर लक्ष्मण जाधव या टेम्पो चालकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गालगत बजरंगवाडी येथे हॉटेल तोरणा समोरुन मन्सूर सय्यद हे रस्ता ओलांडत असताना पुणे बाजूने एम एच १६ ए ई ३७२४ हा टेम्पो भरधाव वेगाने आला. सदर टेम्पोची मन्सूरला जोरदार धडक बसून तो गंभीर जखमी झाला दरम्यान मन्सूर गंभीर जखमी झाला त्याला उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल केले असून डॉक्टरांनी मन्सूर निजाम सय्यद (वय २७) सध्या रा. बजरंगवाडी शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे मूळ रा. कोल्हेवस्ती सुपा ता. पारनेर जि. अहमदनगर याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
याबाबत अमोल बापू नप्ते (वय ३२) फरा. करंदी (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी गंगाधर लक्ष्मण जाधव (वय ३४) रा. करंजेनगर शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे मूळ रा. शिरुर ता. कंधार जि. नांदेड याचे विरुद्ध गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजेश माने व राकेश मळेकर हे करत आहे.
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…
एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…
पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…
मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…
निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…
‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…