क्राईम

शिरुर तालुक्यातून एका व्यक्तीची चैन हिसकावणारे अखेर जेरबंद

शिक्रापूर (शेरखान शेख): जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथील व्यंकटेशकृपा शुगर मिल्स या साखर कारखान्याकडे जनावरांसाठी चारा आणण्यासाठी गेलेल्या व्यक्तीच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावणाऱ्या दोघांना शिक्रापूर पोलिसांनी जेरबंद केले असताना शिवाजी बाळू शेंडकर व सचिन काळूराम दौंडकर असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे असून त्यांचे दोन साथीदार फरार झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथील व्यंकटेशकृपा शुगर मिल्स या साखर कारखान्याकडे पप्पू शेख हे १ फेब्रुवारी रोजी दुचाकीहून जनावरांसाठी चारा आणण्यासाठी गेले असताना दुचाकीहून आलेल्या युवकांनी पप्पू शेख यांना थांबण्याचा इशारा करत त्यांच्या गळ्यातील अडीच तोळे वजनाची सोन्याची चैन हिसकावून घेऊन पळून गेले होते.

याबाबत पप्पू हमीद शेख (वय ५२) रा. महाबळेश्वर नगर शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिस गुन्ह्याचा तपास करत असताना शिवाजी शेंडकर व सचिन दौंडकर यांनी त्यांच्या मित्रांच्या मदतीने सदर गुन्हा केल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे, रणजीत पठारे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे, पोलीस हवालदार श्रीमंत होनमाने, शिवाजी चितारे, अमोल दांडगे, लखन शिरसकर, अमोल नगले, जयराज देवकर, किशोर शिवणकर, निखील रावडे यांनी दोघा आरोपींचा शोध घेत त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी त्यांच्या दोन साथीदारांच्या मदतीने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली.

दरम्यान पोलिसांनी सदर आरोपींकडून चोरलेली चैन तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करत शिवाजी बाळू शेंडकर (वय २३) रा. पेरणे फाटा ता. हवेली जि. पुणे व सचिन काळूराम दौंडकर (वय ३३) रा. शेलपिंपळगाव ता. खेड जि. पुणे या दोघांना अटक केली, तर त्यांच्या दोन साथीदारांचा शोध पोलीस घेत असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत पठारे व पोलीस नाईक अमोल नगले हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

10 तास ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

1 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

3 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

4 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

4 दिवस ago