क्राईम

धक्कादायक! जन्मदात्या आईनेच चिमुकलीला मारुन कचऱ्याच्या धिगाऱ्यात फेकलं अन…

पालघर: जन्मदात्या आईनेच तीन वर्षीय पोटच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना पालघरमधील जव्हार येथे उघड झाली आहे .

मागील 2 वर्षांपासून पतीपासून वेगळं राहून आपल्या 3 मुलांचा सांभाळ करणाऱ्या निर्दयी आईने आपल्याच मुलीची हत्या केली. आर्थिक कणकण भासू लागल्याने महिलेनं आपल्या साना सुलेमानी या 3 वर्षीय चिमुकलीची हत्या केल्याचा अंदाज पोलीस प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

अफसाना उर्फ तारा सुलेमानी असं या निर्दयी आईच नाव असून घडलेल्या धक्कादायक घटनेनंतर जव्हार पोलिसांनी आरोपी आईला ताब्यात घेतलं आहे. पालघर जिल्ह्यातील जव्हार येथील साना सुलेमान या 3 वर्षीय चिमुकलीचा मृतदेह तिच्याच घराशेजारील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात प्लास्टिकच्या पिशवीत कोंबलेल्या अवस्थेत आढळून आला.

यानंतर एकच खळबळ उडाली आहे. तपासानंतर सानाची आई अफसाना उर्फ तारा सुलेमानी हिला जव्हार पोलिसांनी 302 आणि 201 अंतर्गत गुन्हा दाखल करून ताब्यात घेतलं आहे. सानाची आई इतरांच्या घरात घरकाम करत करुन उदरनिर्वाह करायची. ती आपल्या पतीपासून विभक्त होऊन मागील 2 वर्षापासून 3 मुलांसह जव्हार येथे राहत होती.

मात्र तिची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने त्यांच्या घरात नेहमीच पैशांवरुन वाद होत होते. याच आर्थिक कणकणीला कंटाळून आरोपी आईने 3 वर्षीय चिमुकल्या सानाची हत्या केल्याचा अंदाज पालघर पोलिसांनी वर्तवला आहे.

या प्रकरणात जव्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर आरोपी आईची कसून चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली आहे. मात्र, हत्येचं खरं कारण काय होतं हे तपासानंतर स्पष्ट होईल, अशी माहिती पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यातील दरोड्यादरम्यान महिलेचा खून; आरोपी गजाआड…

शिक्रापूर : जातेगावमध्ये (ता. शिरूर) ज्येष्ठ महिलेचा खून करून दागिने लुटणाऱ्या दरोडेखोरांना ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे…

4 तास ago

सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी हटवली, पण शेतकऱ्यांना फायदा नाहीच…

पुणे: केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी हटवली असली तरी, दुसऱ्या बाजूला 550 डॉलर प्रति मेट्रिक…

5 तास ago

शिक्रापूरच्या माजी उपसरपंचाच्या आत्महत्येने उडाली खळबळ…

शिक्रापूर: शिक्रापूरचे (ता. शिरूर) माजी उपसरपंच तसेच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य रमेश राघोबा थोरात यांनी विहिरीमध्ये…

6 तास ago

कवठे येमाई आरोग्य केंद्रात ‘डॉक्टर दाखवा बक्षीस मिळवा’ वैतागलेल्या ग्रामस्थांनी ठोकले आरोग्य केंद्राला टाळे

शिरुर (अरुणकुमार मोटे) कवठे येमाई (ता.शिरुर) येथील आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी नियमितपणे उपलब्ध राहत नसल्याने…

19 तास ago

करंदी गावातील कार्यकर्त्यांना नोटीसा; शिवाजीराव आढळराव यांच्या आडुन नक्की वार करतंय कोण…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर लोकसभा मतदारसंघात सध्या लोकसभा प्रचार शिगेला पोहचला असुन कार्यकर्त्यांनी आपल्या सभेत…

19 तास ago

शिरुर तालुक्यातील टाकळी हाजी येथे किराणा दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी तब्बल 26 लाखाचे नुकसान

शिरुर (अरुणकुमार मोटे) टाकळी हाजी (ता.शिरुर) येथे सागर किराणा स्टोअर्स या दुकानाला आज गुरुवार (दि.२)…

2 दिवस ago