क्राईम

शिरूर तालुक्यातील दरोड्यादरम्यान महिलेचा खून; आरोपी गजाआड…

शिक्रापूर : जातेगावमध्ये (ता. शिरूर) ज्येष्ठ महिलेचा खून करून दागिने लुटणाऱ्या दरोडेखोरांना ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने गजाआड केले असून, दरोडेखोरांकडून पाच गुन्हे उघडकीस आले आहेत.

पोलिसांनी टोळीप्रमुख अविनाश उर्फ लंगड्या उर्फ गिल्या रमेश काळे (वय २८, रा. कोळगाव मोहरवाडी, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर), प्रवीण दीपक भोसले (वय २१, रा. जातेगाव फाटा, ता. शिरुर, जि. पुणे) यांना अटक केली आहे. शिवाय, एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. अविनश काळे याच्याविरुद्ध दरोडा, घरफोडी असे गंभीर स्वरुपाचे १५ गुन्हे दाखल आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.

जातेगाव बुद्रुक परिसरात २४ एप्रिल रोजी मध्यरात्री काळे, भोसले आणि अल्पवयीन साथीदाराने मिळून एका घरात दरोडा टाकला होता. आरोपींनी कृष्णाबाई ज्ञानेश्वर इंगवले (वय ७६) यांना बेदम मारहाण करून त्यांच्याकडील दागिने लुटले होते. मारहाणीत त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. यी घटनेनंतर जातेगाव परिसरात घबराट उडाली होती. याप्रकरणी शिक्रापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिक्रापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक रत्नदीप गायकवाड, सहायक निरीक्षक राहुल गावडे, कुलदीप संकपाळ, योगेश लंगुटे, अमित सिदपाटील यांनी तपास सुरू केला. आरोपी काळे, भोसले आणि साथीदाराने दरोडा टाकल्याची माहिती तपासात मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले.

शिरूर तालुक्यात सशस्त्र दरोडा! दरोडेखोरांच्या हल्ल्यात महिला ठार, तर…

शिक्रापुर पोलीसांनी घातक हत्यारासह दरोडा टाकणाऱ्या पाच आरोपींना केले गजाआड

दरोडा टाकुन जबरी चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीच्या म्होरक्यास अटक

शिरुर तालुक्यात दरोडा टाकुन रोख रकमेसह सोन्याच्या दागिन्याची चोरी

महिलेला धाक दाखवत सशस्त्र दरोडेखोरांकडून बंगल्यावर दरोडा

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

15 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

19 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

19 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

19 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

19 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

20 तास ago