क्राईम

पुणे नगर महामार्गावर अपघातात एकाचा मृत्यू तिघे गंभीर जखमी

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे मध्यरात्रीच्या सुमारास एक कार दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात कारचे नुकसान होत एका युवकाचा मृत्यू होत तिघे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली असून अमोल संभाजी फुले असे मृत तरुणाचे नाव आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावरून चौघे मित्र त्यांच्या ताब्यातील एम एच १२ एम एफ ६६६४ या सियाज कार मधून अहमदनगर बाजूने पुणे बाजूकडे चाललेले असताना रात्री दहा वाजण्याच्या सुमारास त्यांची कार येथील दुभाजकावर आदळून शेजारील पत्र्यांना धडकली. सदर भीषण अपघाताची माहिती मिळताच पोलीस हवालदार राजेश माने, पोलीस नाईक अंबादास थोरे, राकेश मळेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली.

दरम्यान येथील नागरिकांनी जखमींना उपचारासाठी सूर्या हॉस्पिटल मध्ये दाखल केले असता घडलेला अपघात अमोल संभाजी फुले (वय ३५) रा. सासवड ता. पुरंदर जि. पुणे याचा उपचारापूर्वी मृत्यू झाला तर वैभव सुभाष कुंभारकर (वय २८) व अनिकेत उर्फ बाबू शरद चौखंडे (वय २३) दोघे रा. सासवड ता. पुरंदर तसेच नितीन बबन देशमुख (वय ३१) रा. केडगाव जि. अहमदनगर हे तिघे जखमी झाले आहे.

याबाबत पोलीस नाईक अंबादास अश्रुबा थोरे रा. शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजेश माने हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

10 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

14 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

14 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

14 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

14 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

15 तास ago