शिरूर तालुका

पारगाव-पुणे एस.टी. बससेवा पूर्ववत करा, आगारप्रमुख शिर्के यांना निवेदन

शिरुर (अरुणकुमार मोटे): गेली काही दिवसांपासून बंद असलेली पारगाव तर्फे आळे ते पुणे एस.टी बस सेवा पुन्हा सुरु करण्यात यावी या संदर्भातील निवेदन वडनेर खुर्द ग्रामपंचायतीच्या वतीने शिरुर येथील आगारप्रमुख शिर्के यांना देण्यात आले. कोरोना काळातील प्रवाशी संख्या घटून मोठे नुकसान झाल्याने सदरची एस.टी. बस सेवा बंद करण्यात आल्याने साकोरी, पारगाव तर्फेआळे, पिंपरखेड, जांबूत, शरदवाडी, वडनेर खुर्द, टाकळी हाजी, माळवाडी, डोंगरगण, आमदाबाद, मलठण, वाघाळे, वरुडे, गणेगाव, बुरुंजवाडी, शिक्रापूर मार्गे शालेय विद्यार्थ्यांसह, शेतकरी व नागरिकांना प्रवास करण्यासाठी मोठी गैरसोय निर्माण झाली आहे. सदरची बससेवा चालू झाली तर प्रवाशांना प्रवास करणे सोयीचे ठरणार आहे .

सदरची बससेवा पूर्ववत करण्यासाठी वडनेर ग्रामपंचायतीच्या वतीने साईक्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक नवनाथ निचित, उपसरपंच विक्रम निचित यांनी शिरूर येथील आगारप्रमुख शिर्के यांना निवेदन देऊन संबंधित बस सेवा पूर्ववत करण्यासंदर्भात सूचना केली असून गणेशोत्सवानंतर सदरची बससेवा पुन्हा पूर्ववत करण्यात येईल असे आश्वासन शिर्के यांनी दिले असल्याचे नवनाथ निचित यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

7 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

11 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

11 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

11 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

11 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

11 तास ago