क्राईम

कोंढापुरीत वाहनाच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू

शिक्रापूर (शेरखान शेख): कोंढापुरी (ता. शिरुर) येथे पुणे नगर महामार्गावर रस्ता ओलांडत असताना स्कोर्पिओच्या धडकेत पांडुरंग रंगनाथ काळे या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे स्कोर्पिओ चालकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

कोंढापुरी (ता. शिरुर) येथील चौकातून पुणे नगर महामार्गावर पांडुरंग काळे हे रस्ता ओलांडत असताना अहमदनगर बाजूने पुणे बाजूकडे जाणाऱ्या एम एच १७ बी एक्स ५१७९ या स्कोर्पिओ कार ची काळे यांना जोरदार धडक बसली यावेळी काळे रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले.

दरम्यान येथील नागरिकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी पांडुरंग रंगनाथ काळे (वय ८2) रा. कवठेमळा कोंढापुरी (ता. शिरुर) जि. पुणे यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

याबाबत मुरलीधर पांडुरंग काळे (वय ५२) रा. कवठेमळा कोंढापुरी (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी एम एच १७ बी एक्स ५१७९ या स्कोर्पिओ वरील अज्ञात चालकावर गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अपुऱ्या पावसाने शेतकरी संकटात; धीरज देशमुखांची सरकारकडे विशेष दुष्काळ पॅकेजची मागणी

लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…

8 तास ago

प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मान मिळणे गरजेचे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे: शिक्षणात सर्वसमावेशकता आणून प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मानाची वागणूक मिळणे अत्यंत गरजेचे आहे,…

8 तास ago

शिरुर; शेतीपंपांच्या रात्रीच्या वीज वेळापत्रकात बदल करण्याची शेतकऱ्यांची मागणी; दिवसा ८ तास अन रात्री ६ तास वीज

बिबट्याच्या दहशतीत शेतकऱ्यांचा जीव धोक्यात; जीव मुठीत धरुन पिकांना पाणी देण्याची वेळ शिरुर (तेजस फडके):…

9 तास ago

चार महिन्यांतच संसाराचा दुर्दैवी अंत; २४ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय

चारचाकीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा? छळाच्या आरोपावरून सात जणांविरुद्ध गुन्हा छत्रपती संभाजीनगर : अवघ्या चार…

14 तास ago

मोदींचा फोटो असावा, पण शिवरायांच्या रांगेत नको; अमित ठाकरे प्रकरणावर राज ठाकरेंची स्पष्ट भूमिका

पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या प्रकरणात अमित…

14 तास ago

ओव्हरटेकच्या नादात २.५ कोटींच्या SUVची दुचाकीला धडक; एका पार्सलसाठी घराबाहेर पडला अन् परतलाच नाही

मुंबई: वांद्रे-वरळी सी लिंक रेक्लेमेशनजवळ कोस्टल रोडवर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात…

14 तास ago