तळीरामांच्या त्रासाने व्यावसायिक नागरिक व महिला त्रस्त
शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील बाजार मैदान तेथे न्हावरा रोड लगत भर बाजार मैदानात खुलेआम दारुची विक्री होत असून येथील तळीरामांच्या त्रासाने जवळील व्यवसायिक व नागरिक त्रस्त झाले असून खुलेआम दारु विक्री होत असताना पोलिसांचा यावर वचक आहे कि नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन अंतर्गत तळेगाव ढमढेरे गावामध्ये स्वतंत्र पोलीस चौकी असून सदर ठिकाणी स्वतंत्र पोलीस अधिकारी व कर्मचारी नेमण्यात आलेले आहे. मात्र परंतु गावातील अनेक ठिकाणी गावठी दारु सह देशी विदेशी दारुची विक्री होत असताना यापूर्वी पोलिसांकडून कारवाई सुद्धा झालेली आहे. मात्र सध्या गावातील मुख्य बाजार मैदानात खुलेआम अनधिकृतपणे देशी विदेशी दारुची विक्री होत असून यापूर्वी कारवाई नंतर सदर दारु विक्री काही काळ बंद होत पुन्हा नव्याने सुरु झाली असल्याने सदर ठिकाणी मोठा वरदहस्त असल्याचे बोलले जात आहे, तर मुख्य बाजार पेठेत दारु विक्री होत असल्याने येथील मद्यपी व तळीरामांचा शेजारील व्यवसायिक व नागरिकांना त्रास होत आहे.
मात्र गावामध्ये स्वतंत्र पोलीस अधिकारी व कर्मचारी असताना देखील दिवसाढवळ्या राजरोसपणे दारुची विक्री होत असल्याने सदर चौकीच्या अधिकाऱ्यांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. मात्र आता पोलीस या ठिकाणी कारवाई करत अनधिकृतपणे सुरु असलेली दारुविक्री बंद करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
याबाबत तळेगाव ढमढेरे पोलीस चौकीचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत पठारे यांच्याशी संपर्क साधला असता यापूर्वी कारवाई साठी गेलो असता काही आढळून आले नाही. मात्र आता कर्मचाऱ्यांना पाठवून कारवाई केली जाईल, असे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत पठारे यांनी सांगितले.
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…