मुख्य बातम्या

रांजणगाव सोसायटीची मार्च अखेर शंभर टक्के कर्ज वसुली, नवीन इमारतीसाठी बँकेत 34 लाख मुदत ठेव

रांजणगाव गणपती (तेजस फडके) कोणत्याही सोसायटीची अर्थिक वसुली साधारणतः जून महिन्यात पुर्ण होत असती , माञ रांजणगाव गणपती येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या इतिहासात प्रथमच सन २०२३-२४ ची बँक पातळीवरील वसुली मार्च २०२४ अखेर 100 टक्के वसुली झाली असुन विकासोच्या नवीन इमारतीसाठी 34 लाख रुपयांची मुदत ठेव (Fix Deposit) रांजणगाव येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत ठेवण्यात आल्याची माहिती सोसायटीचे चेअरमन बापुसाहेब शिंदे यांनी दिली.

 

रांजणगाव गणपती विविध विकास सेवा कार्यकारी सोसायटीची स्थापना १९२१ साली स्थापन झाली आहे. तेव्हापासुन आजपर्यंत प्रथमच सोसायटीने ३४ लाख रुपयांची मुदत ठेव (Fix Deposit) सोसायटीच्या नवीन कार्यालयाच्या बांधकामासाठी पुणे जिल्हा बँकेच्या रांजणगाव शाखेत करण्यात आली असल्याचे चेअरमन बापुसाहेब शिंदे यांनी सांगितले.

 

तसेच लवकरच विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वतीने विविध उद्योग व्यवसाय चालु करण्याचा विचार आहे. त्यामध्ये जेनेरिक मेडीकल केंद्र, शासनाच्या अनुषंगाने ई कृषीसेवा केंद्र, नागरी सुविधा केंद्र सुरु करणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. तसेच या कामांसाठी सोसायटीचे सर्व संचालक मंडळ, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे रांजणगाव शाखेचे विकास अधिकारी सचिन मांढरे, सोसायटीचे सचिव दिलीप रघुनाथ पुणेकर व मदतनीस आरती दत्ताञय गोरे यांचे मोलाचे योगदान लाभले असल्याचे यावेळी शिंदे म्हणाले.

 

बापुसाहेब शिंदे यांच्या कार्यकाळात सोसायटी नफ्यात…

शिरुर तालुक्यात प्रथमच रांजणगाव सोसायटीचे चेअरमन बापुसाहेब शिंदे यांनी मार्च मध्ये सोसायटीचे कर्ज जुने -नवे करण्यासाठी तसेच सोसायटीची वसुली 100 टक्के व्हावी. यासाठी शेतकऱ्यांना स्वतःच्या खिशातुन आर्थिक मदत केली होती. त्यामुळे 100 टक्के वसुली झाल्याने सोसायटी नफ्यात आली. सोसायटी नफ्यात आल्याने रांजणगाव सोसायटीच्या नवीन कार्यालयाच्या बांधकामासाठी प्रथमच ३४ लाख रुपयांची मुदत ठेव (Fix Deposit) पुणे जिल्हा बँकेच्या रांजणगाव शाखेत ठेवण्यात आली आहे. त्यामुळे बापुसाहेब शिंदे यांच्यासारखा दूरदृष्टी असणारा चेअरमन तालुक्यातील प्रत्येक गावच्या सोसायटीला लाभल्यास विविध कार्यकारी सहकारी सोसायट्या आर्थिक सक्षम होतील यात तिळमात्र शंका नाही.

शेतकऱ्यांच्या सोसायटीचा भरणा करण्यासाठी धावून आले चेअरमन; बापुसाहेब शिंदे यांची शेतकऱ्यांना आर्थिक मदत

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सावधान; स्वीट होम मध्ये मिठाई घेताय जरा जपुन,रांजणगाव येथील स्वीट होमच्या मिठाईत सापडली मेलेली अळी

रांजणगाव गणपती (तेजस फडके) सध्या फास्ट फूड खाण्याच प्रमाण वाढलं असुन पुणे-नगर महामार्गाच्या येथे रस्त्याच्या…

23 तास ago

शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा भीषण स्फोट…

शिक्रापूर : शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना आज (रविवार) पहाटे…

2 दिवस ago

माहेर संस्थेमुळे दोन मनोरुग्ण महिलांची कुटुंबासोबत भेट मृत समजुन एका महिलेचे केले होते धार्मिक विधी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे मानसिक संतुलन हरवलेल्या दोन महिलांवर योग्य औषधोपचार…

3 दिवस ago

पुणे-सोलापूर महामार्गावर बँड पथकावर होर्डिंग कोसळल्याने एक घोडा जखमी

पुणे (प्रतिनिधी) सध्या राज्यात अवकाळी पाऊसामुळे अनेक ठिकाणी होर्डींग कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य…

3 दिवस ago

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…

6 दिवस ago

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…

1 आठवडा ago