क्राईम

शिरुर तालुक्यात सापडले महिलेचे अर्धवट जळालेले प्रेत…

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील एका अज्ञात महीलेचे अर्धवट जळालेल्या स्थितीत प्रेत सापडले असून या घटनेने मोठी खळबळ उडाली असून या अज्ञात महीलेबाबत काही माहीती मिळाल्यास शिरुर पोलिस स्टेशनला संपर्क करण्याचे आवाहन शिरुर पोलिसांनी केले आहे.

याबाबत सविस्तर माहीती अशी की, (दि. ८) रोजी दुपारनंतर शिरुर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मौजे उरळगाव, चोरमले वस्ती जवळील पाझर तलावाचे नजीक पुलाजवळ एक अनोळखी स्री वय ३० ते ३५, अंगात अर्धवट जळालेली चॉकलेटी, पिवळसर, सफेद फुलांचे नक्षीची साडी, चॉकलेटी रंगाचा ब्लाऊज, डाव्या हाताचे बोटात पिवळे धातूची पिळ्याची अंगठी, दोन्ही हातात काचेच्या लालसर बांगड्या, दोन्ही हातात पिवळे धातूच्या दोन – दोन बांगड्या, डाव्या हाताचे मनगटा जवळ गोल फुल गोंदलेले अशा वर्णनाच्या महिलेचे प्रेत अर्धवट जळालेल्या अवस्थेत मिळून आलेले आहे.

तरी अशा वर्णनाची कोणी महिला घरातून निघून गेलेली असल्यास, अगर अशा वर्णनाचे कोणी परिचित असल्यास तात्काळ शिरुर पोलीस स्टेशन मध्ये संपर्क साधण्यास विनंती आहे संपर्क शिरुर पोलीस स्टेशन 02138-222139

पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत 9823108452 या प्रकरणाचे नक्की गुढ काय आहे? मृतदेह का जाळला? या गोष्टींचा शोध शिरुर पोलिसांकडून सुरु झाला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

5 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

20 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

1 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

1 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

1 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

1 दिवस ago