क्राईम

जातेगाव खुर्दमध्ये वडील व भावाकडून व्यक्तीला मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): जातेगाव खुर्द (ता. शिरुर) येथे जन्मदात्या वडील व सख्या भावाकडून एका व्यक्तीला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे ज्ञानेश्वर वामन मासळकर व दिनेश ज्ञानेश्वर मासळकर या दोघा बापलेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

जातेगाव खुर्द (ता. शिरुर) येथील दिलीप मासळकर हे सध्या पुणे येथे राहत असून ते 7 ऑक्टोबर रोजी आपल्या गावी आलेले होते. त्यावेळी त्यांचा भाऊ दिनेश याने दिलीप यांच्या वाट्याला असलेल्या खोलीला असलेले पार्टीशियन काढून टाकल्याचे दिसले म्हणून दिलीप यांनी तू माझे खोलीचे पार्टीशियन का काढले असे विचारले असता दिनेश याने शिवीगाळ, दमदाटी करण्यास सुरवात केली. तसेच यावेळी दिलीप यांच्या वडिलांनी देखील शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण केली. झालेल्या मारहाणीमध्ये दिलीप यांच्या डोळ्याजवळ मार लागला.

याबाबत दिलीप ज्ञानेश्वर मासळकर (वय ५०) रा. जातेगाव खुर्द (ता. शिरुर) जि. पुणे सध्या रा. आनंदपार्क सोसायटी वडगाव शेरी पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी ज्ञानेश्वर वामन मासळकर व दिनेश ज्ञानेश्वर मासळकर दोघे रा. जातेगाव खुर्द (ता. शिरुर) जि. पुणे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक भरत कोळी हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अंग दुखण्याची कारणे

थंड हवा थेट अंगावर लागणे: एसी किंवा फॅनची हवा जर थेट तुमच्या शरीरावर येत असेल,…

5 तास ago

केस खूपच पातळ झाले-जराही वाढत नाही? हे ५ पदार्थ खा, विंचरताना कंटाळा येईल इतके वाढतील केस

केस नैसर्गिकरित्या काळे राहण्यासाठी आणि केस वाढवण्यासाठी खास डाएट फॉलो करणंही गरजेचं असतं. केसांना पोषण…

5 तास ago

शिक्षक दिनानिमित्त गुणवंत शिक्षकांचा सन्मान; विजय सावंत यांना लायन्स क्लब शिक्षक पुरस्कार

मुंबई : शिक्षक दिनानिमित्त अभ्युदय येथील शिवाजी विद्यालयात लायन्स क्लब ऑफ मीडटाऊनच्या वतीने मुंबईतील उपक्रमशील…

5 तास ago

गणेशभक्तांसाठी शिवसेनेची मोठी घोषणा; २९०० एसटी बसची मोफत व्यवस्था

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील आपल्या गावी जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुखकर आणि आरामदायी व्हावा,…

6 तास ago

नगराध्यक्षांच्या स्वाक्षरीचा संभ्रम अखेर दूर; नमुना क्र. ६४ वर आता मुख्याधिकाऱ्यांचीच अंतिम सही

मुंबई : राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या आर्थिक व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या नमुना क्र. ६४ वर नगराध्यक्षांची…

6 तास ago

अपुऱ्या पावसाने शेतकरी संकटात; धीरज देशमुखांची सरकारकडे विशेष दुष्काळ पॅकेजची मागणी

लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…

19 तास ago