body
शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) येथील चासकमान कालव्याच्या पाण्यात पडून सोमनाथ गंगाराम माने या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
करंदी (ता. शिरुर) येथील सोमनाथ माने हे पाच ऑक्टोबर रोजी बाहेर गेलेले होते. सायंकाळी उशिरा पर्यंत घरी न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला मात्र ते मिळून आले नाही, तर सकाळच्या सुमारास काही नागरिकांना करंदी फाटा येथील चासकमान कालव्यात एक व्यक्ती पडून मृत्यू झाल्याचे दिसून आले.
दरम्यान पोलीस शिपाई अंबादास थोरे, पोलीस पाटील वंदना साबळे यांसह आदींनी सदर ठिकाणी जात पाहणी करुन मृतदेह बाहेर काढला असता सदर ठिकाणी सोमनाथ गंगाराम माने (वय ६०) रा. करंदी (ता. शिरुर) जि. पुणे मूळ रा. भालगाव ता. बार्शी जि. सोलापूर यांचा पाण्यात पडून मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले.
याबाबत कैलास सोमनाथ माने (वय ३१) रा. करंदी (ता. शिरुर) जि. पुणे मूळ रा. भालगाव ता. बार्शी जि. सोलापूर याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस नाईक भरत कोळी हे करत आहे.
शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…