क्राईम

पिकअप गँगचा धडाकेबाज पर्दाफाश; तिघे जेरबंद, ५ गुन्ह्यांचा भंडाफोड

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): शेतवस्तीवरील वयोवृद्धांना लक्ष्य करत दरोडे टाकणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा स्थानिक गुन्हे शाखा व शिक्रापूर पोलिसांनी पर्दाफाश करत मोठे यश मिळवले आहे. या कारवाईत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून दोन दरोडे आणि तीन जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ८ फेब्रुवारी २०२६ रोजी मध्यरात्री खैरेनगर (ता. शिरूर) येथे चार अज्ञात आरोपींनी तोंडाला रुमाल बांधून बाळू धोंडींबा खैरे (वय ६९) यांच्या घरावर दरोडा टाकला. दरवाजा दगडाने फोडून घरात घुसलेल्या आरोपींनी खैरे यांना मारहाण केली आणि त्यांच्या पत्नीचे दागिने लुटले. त्यानंतर शेजारील सुनील खैरे यांच्या घरात कोयत्याचा धाक दाखवत दरोडा टाकण्यात आला. या दोन्ही घटनांमध्ये सुमारे ४ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटण्यात आला होता.

या गंभीर घटनेनंतर पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथके तयार करण्यात आली. तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी पांढऱ्या रंगाच्या पिकअप वाहनाचा वापर करत असल्याचे निष्पन्न झाले.

गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी जातेगाव येथे सापळा रचून अनिरुद्ध किरण भोसले (रा. आष्टी, जि. बीड) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर निकेश रोहिदास काळे (रा. जातेगाव, ता. शिरूर) आणि विकी संजय काळे (रा. भोरवाडी, जि. अहमदनगर) यांना अटक करण्यात आली.

चौकशीत वैभव भोसले, तपेश भोसले (रा. बीड) आणि संदेश भोसले (रा. केडगाव, जि. अहमदनगर) यांचा सहभाग समोर आला असून त्यानुसार गुन्ह्यात वाढीव कलमे लागू करण्यात आली आहेत.

या टोळीने शिक्रापूर, आळेफाटा आणि शिरूर परिसरात मिळून दोन दरोडे व तीन जबरी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली पिकअप गाडी जप्त करण्यात आली आहे. तसेच त्यांच्यावर यापूर्वीही विविध जिल्ह्यांत मालमत्ता चोरीचे गुन्हे दाखल असल्याने ते सराईत गुन्हेगार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पो.नि. दिपरतन गायकवाड व त्यांच्या पथकाने केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे करत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

ज्ञानेश हटाव, लोकशाही बचाव’; व्होटचोरीच्या आरोपावरून काँग्रेस आक्रमक

बुलढाणा: भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणूक आयोगाच्या मदतीने कथित…

9 तास ago

MPSC विद्यार्थ्यांचा अपमान केल्याबद्दल माफी मागा’; भाजप प्रवक्त्यांवर अमोल मातेलेंचा हल्लाबोल

पुणे: पुण्यात आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या MPSC विद्यार्थ्यांबाबत भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलेल्या…

16 तास ago

महाराष्ट्राचा बुलंद, बाणेदार आवाज शांत झाला; सच्चा, दिलदार मित्र गमावला; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: चित्रपट क्षेत्रात अभिनयाची उत्तुंग शिखरे गाठणारे, संवादफेकीपासून मुद्राभिनयापर्यंत स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण करणारे आणि…

18 तास ago

नाना केवळ महान अभिनेते नव्हते, तर सामान्यांच्या दुःखाशी जोडलेला संवेदनशील माणूस होते

नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्व पोरके; सचिन अहिर यांची भावपूर्ण श्रद्धांजली  मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टी…

18 तास ago

नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्वाने हरहुन्नरी कलाकार गमावला; सुनेत्रा पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवर आपल्या अजोड आणि दमदार अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना…

18 तास ago

व्होट चोर ज्ञानेश कुमारला महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

आला तर तोंडाला काळे फासणार; निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात काँग्रेसचा आक्रमक इशारा मुंबई: देशाचे मुख्य निवडणूक…

1 दिवस ago