मुख्य बातम्या

शिरुर; पिंपरखेडच्या सौम्याचे उज्ज्वल यश, नवोदय विद्यालयासाठी निवड, सर्व स्तरातुन कौतुकाचा वर्षाव

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इयत्ता पाचवीतील विद्यार्थीनी सौम्या सुनील वरे हिने शैक्षणिक वर्ष सन २०२५-२०२६ मध्ये घेण्यात आलेल्या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत नवोदय विद्यालयासाठी आपली निवड निश्चित केली आहे. तिच्या या यशामुळे शाळेसह संपूर्ण गावाची मान उंचावली असून परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

दि १५ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या या स्पर्धात्मक परीक्षेत हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. कठीण स्पर्धेतून मार्ग काढत सौम्याने मिळवलेले हे यश तिच्या मेहनतीचे आणि जिद्दीचे प्रतीक मानले जात आहे. तिच्या या यशामागे शाळेचे मुख्याध्यापक पी. सी. बारहाते तसेच वर्गशिक्षक लहू गाजरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.

भारत सरकारच्या वतीने दरवर्षी घेण्यात येणाऱ्या नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांना इयत्ता सहावी ते बारावीपर्यंत CBSE अभ्यासक्रमानुसार दर्जेदार व मोफत शिक्षण, तसेच निवास, भोजन व इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात. पुणे जिल्ह्यातील पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील नवोदय विद्यालयात सौम्या पुढील शिक्षण घेणार आहे.

सौम्या ही सर्वसामान्य कुटुंबातील असून तिचे वडील सुनील वरे हे शेतीसोबतच ‘आपले सरकार सेवा केंद्र’ चालवतात, तर आई सारिका वरे या कोतवाल म्हणून कार्यरत आहेत. प्रतिकूल परिस्थितीतही सौम्याने जिद्दीने अभ्यास करून मिळवलेले हे यश अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. तिच्या या यशाबद्दल गावकऱ्यांच्या वतीने तिचा व मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला माजी उपसरपंच रामदास ढोमे, विकासोचे अध्यक्ष किरण ढोमे, लक्ष्मण गायकवाड, कैलासराव बोंबे, विजय बोंबे, आबाजी पोखरकर, पंढरीनाथ वरे, देवराम ढोमे, माउली ढोमे, बाळासाहेब बोंबे, अविनाश वरे, गौरेश दरेकर, सागर लोंढे, सर्जेराव उदागे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.सौम्याच्या यशामुळे पिंपरखेड गावात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून, भविष्यात ती आणखी मोठे यश मिळवेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

देवेंद्र! बस नाम ही काफी है; मुख्यमंत्री फडणवीसांना एकनाथ शिंदेंच्या भरभरून वाढदिवसाच्या शुभेच्छा

'महाराष्ट्राच्या राजकारणातील बिग डी' म्हणत फडणवीसांच्या नेतृत्व, बुद्धिमत्ता आणि विकासदृष्टीचे शिंदेंकडून भरभरून कौतुक मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र…

5 मिनिटे ago

रांजणगाव MIDC पोलिसांनी दुचाकी चोराला धाराशिवमधून केली अटक

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव औद्योगिक वसाहत परिसरातील महागणपती पार्किंगमधून चोरीस गेलेल्या मोटारसायकलचा छडा लावत…

10 मिनिटे ago

शिक्षकांच्या सूचनांवरच घडणार शिक्षणातील बदल; ‘शिक्षण संवाद २०२६’मध्ये शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांची ग्वाही

मुंबई : राज्यातील शिक्षण व्यवस्था अधिक गुणवत्तापूर्ण, विद्यार्थीकेंद्रित आणि परिणामकारक करण्यासाठी शिक्षकांच्या प्रत्यक्ष अनुभवांना व…

13 मिनिटे ago

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जविरोधात काँग्रेसचा भाजपावर मोर्चा; राहुल गांधींना दिलेल्या वागणुकीचा निषेध

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी; परीक्षांतील अनियमिततेवर संसदेत चर्चा आणि विद्यार्थ्यांवरील FIR मागे घेण्याची मागणी मुंबई:…

18 मिनिटे ago

झुरळ विचारांची पुरळ नव्हे, विकासाचा मार्ग निवडूया

मुंबई: भारतभूमी ही केवळ भौगोलिक सीमा नसून हजारो वर्षांची संस्कृती, ज्ञान, परंपरा, संघर्ष आणि सामर्थ्याची…

24 मिनिटे ago

जन्मदिवस जयंती म्हणून साजरा करावा लागतोय’ या भावनेने कार्यकर्त्यांच्या डोळ्यांत अश्रू

मुंबई: माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात आज त्यांना भावपूर्ण…

27 मिनिटे ago