क्राईम

दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक; दोघांसह चिमुकला ठार…

शिक्रापूरः हवेली तालुक्यातील अष्टापूर फाटा परिसरात एका भरधाव दुचाकीने समोरून येणाऱ्या दुचाकीला समोरा समोर जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन दुचाकीस्वारांसह एका ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

लोणीकंद पोलिस चौकीच्या हद्दीत एस टी बसच्या अपघाताला एक दिवस हित नाही तोच दुसरा भीषण अपघात झाला आहे. हवेली तालुक्यातील अष्टापूर फाटा परिसरात एका भरधाव दुचाकीने समोरून येणाऱ्या दुचाकीला समोरा समोर जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन दुचाकीस्वारांसह एका ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. प्रवीण सुनील पाटोळे (वय २८), राजवीर प्रवीण पाटोळे (वय ६ दोघे रा. अष्टापूर, ता. हवेली, नगर रस्ता ) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. तर दूसरा दुचाकीस्वार यश शेखावत (वय २१ रा. न्हावी सांडस फाटा, ता. हवेली, नगर रस्ता) हा गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यू झाला. मृत शेखावत वर या अपघात प्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अक्षय पाटोळे (वय २९ ) यांनी तक्रार दाखल केली आहे.

दुचाकीस्वार प्रवीण व त्यांचा मुलगा राजवीर हे शुक्रवारी (ता. ३१) संध्याकाळी ८ च्या सुमारास घरी जात होते. यावेळी यवत परिसरातील राहू येथून अष्टापूरकडे भरधाव वेगाने यश शेखावत हा त्यांच्या दुचाकीवरून येत होता. यावेळी शेखावतने समोरुन दुचाकीवरुण येणाऱ्या प्रवीण यांना जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा गंभीर होता की, प्रवीण व त्यांचा मुलगा राजवीर हे गंभीर जखमी झाले. तर दुचाकीस्वार शेखावत देखील गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तिघांनाही दवाखान्यात भरती करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच प्रवीण आणि त्यांचा मुलगा राजवीर यांचा मृत्यू झाला होता. तर शेखावतचा देखील उपचार सुरू असतांना मृत्यू झाला. या अपघातात प्रवीण आणि त्यांचा सहा वर्षांचा मुलगा राजवीर यांचा मृत्यू झाला. दोघांच्या मृत्यूमुळे अष्टापूर परिसरात शोककळा पसरली आहे.

शिरूर तालुक्यात महिलेच्या साडीचा पदर दुचाकीच्या चाकात अडकून मृत्यू…

शिरुर; सरदवाडी येथे मोठा अनर्थ टळला रस्ता दुभाजक ओलांडून मालवाहु कंटेनरची थेट सलुन दुकानाला धडक

शिरुर; सामाजिक कार्यकर्त्यांची सुरक्षा ऐरणीवर अशोक भोरडे यांच्या जिवितास धोका पोहचवण्याचा कट…?

शिरुर तालुक्यातही पोर्शे पॅटर्न, पोलिस पाटलाच्या अल्पवयीन मुलीच्या हातात चारचाकी; धडक बसल्याने एकाचा मृत्यू

शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा भीषण स्फोट…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ, दोन शेळ्या, दोन बोकड, अन एक बकरु ठार, गाय जखमी…

कारेगाव (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील निमगाव भोगी येथे बिबट्याने मध्यरात्री गोठ्यात घुसून जनावरांवर हल्ला केल्याची…

1 तास ago

राज्य नाट्य स्पर्धेच्या परीक्षणासाठी अनुभवी कलाकारांकडून अर्ज मागविले

२५ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे आवाहन मुंबई : महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेतील नाटकांच्या…

4 तास ago

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शिवसेनेचा ऐतिहासिक दसरा मेळावा; एकनाथ शिंदे

मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सामाजिक बांधिलकी जपत शिवसेनेने यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा बळीराजाला समर्पित…

4 तास ago

५ हजारांत शेतकऱ्यांची दिवाळी कशी गोड होणार?; हर्षवर्धन सपकाळांचा महायुती सरकारवर घणाघात

हेक्टरी १ लाख रुपये मदत आणि संपूर्ण कर्जमाफी द्या; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सपकाळांनी मांडली…

4 तास ago

शाळा प्रवेशासाठी वयोमर्यादा निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी

मुंबई: राज्यातील पूर्वप्राथमिक ते इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी राज्य शासनाने बालकांचे किमान वय निश्चित केले आहे. नव्या…

7 तास ago

‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही!’दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजारांची अग्रीम मदत

पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला…

15 तास ago