शिरूर तालुक्यात महिलेच्या साडीचा पदर दुचाकीच्या चाकात अडकून मृत्यू…

क्राईम

शिक्रापूर: मुखई (ता. शिरूर) येथे दुचाकीत साडीचा पदर अडकून पडल्याचे महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रेणुका बाबुराव वोइंदे (वय २८, रा. धामारी, ता. शिरुर) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे मृत महिलेच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

धामारी येथील पाबळ-शिक्रापूर रस्त्याने बाबुराव वोइंदे व रेणुका वोइंदे हे दोघे त्यांच्या दुचाकीहून चालले होते. मुखई गावातील मुक्ताई मंदिराजवळ आल्यानंतर रेणुका यांच्या साडीचा पदर दुचाकीच्या चाकात अडकून गुंढाळला गेल्याने रेणुका या जोरात रस्त्यावर पडल्या. अपघातात त्यांच्या डोक्याला जोराचा मार लागल्यामुळे त्यांना तत्काळ उपचारासाठी शिक्रापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण, डॉक्टरांनी त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले.

दरम्यान, हनुमान पवार यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

शिरुर; सरदवाडी येथे मोठा अनर्थ टळला रस्ता दुभाजक ओलांडून मालवाहु कंटेनरची थेट सलुन दुकानाला धडक

शिरुर; सामाजिक कार्यकर्त्यांची सुरक्षा ऐरणीवर अशोक भोरडे यांच्या जिवितास धोका पोहचवण्याचा कट…?

शिरुर तालुक्यातही पोर्शे पॅटर्न, पोलिस पाटलाच्या अल्पवयीन मुलीच्या हातात चारचाकी; धडक बसल्याने एकाचा मृत्यू

रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीत किरकोळ कारणातून युवकाचा खून…

हृदयद्रावक! शिरूर तालुक्यात मामाच्या गावाला आलेल्या दोन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू…