क्राईम

पुण्यातील उंड्री हादरल! मित्राच्या खुनाची माहिती पोलिसांना देणाराच निघाला खुनी

पुणे: पुण्यात मित्रावर विश्‍वास ठेवणं एका तरुणाच्या जीवावर बेतलय. मित्राच्या खुनाची माहिती पोलिसांना देणारा मित्रच मित्राचा खुनी निघाल्याने हडपसर भागात एकच खळबळ उडाली. मात्र मात्र अवघ्या दोन तासातच काळेपडळ पोलिसांनी या आरोपीला बेड्या ठोकल्या.

नक्की प्रकरण काय आहे

किसन राजमंगल सहा याने शनिवारी दोन जुलै रोजी पहाटे पावणे पाच वाजण्याच्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला, उंद्री हांडेवाडी येथील साईगंगा सोसायटीच्या समोरील बाजूस असलेल्या पत्राच्या शेडमध्ये माझा मित्र रविकुमार शिवशंकर यादव याला 3 ते 4 जणांनी लोखंडी रॉडने मारहाण केली आहे. तो रक्ताच्या थारोळ्यात पडला अशी माहिती त्याने पोलिस कंट्रोल रुमला दिली. त्यानंतर पोलिसांची टीम काही मिनिटात घटनास्थळी पोहोचली आणि रविकुमार शिवशंकर यादव याला जवळील रुग्णालयात दाखलं केल. डॉक्टरांनी तपासणी केल्यावर त्याला मृत घोषित करण्यात आलं.

त्यानंतर पोलिसांनी किसन सहा याच्याकडे चौकशी करण्यास सुरुवात केली त्याने सांगितलं की दुचाकीवरून आलेल्या 3 ते 4 जणांनी रविकुमार शिवशंकर यादव याच्याकडे गादी आणि बेड शीट मागितली. त्या वस्तू देण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांच्यात वाद झाला आणि त्या तीन ते चार जणांनी लोखंडी रॉडने त्याला मारहाण केल्याचे सांगितले.त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे पाहिले. मात्र त्यामध्ये पोलिसांना अशा प्रकारची घटना दिसून आली नाही. त्यानंतर पोलिसांनी या घटनेची माहिती देणारा किसन राजमंगल सहा याच्याकडे अधिक चौकशी करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो उडवाउडवीची उत्तर देऊ लागल्यावर, त्याला पोलीस खाक्या दाखवताच किसन राजमंगल सहा यांनी खून केल्याची कबुली दिली. मी आणि रविकुमार दारू पीत बसलो होतो. त्यावेळी आमच्या दोघांमध्ये वाद झाला. तो राग मनात धरून रविकुमार शिवशंकर यादव याच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण केल्याची कबुली आरोपीने दिली.

“कधी कधी खरा धोका बाहेरून नाही, तर आपल्या अगदी जवळच असतो… आणि उंड्रीत घडलेली ही घटना याचं जिवंत उदाहरण आहे.”जेवणाच्या ताटात जेवतं असलेलं नातं, एका क्षणात रक्ताच्या थारोळ्यात कसं बदलू शकतं… हे बघताना अंगावर काटा येतो.”किसन सहा आणि रविकुमार यादव – दोन मित्र, एकत्र दारू प्यायले, गप्पा मारल्या… आणि क्षुल्लक वादातून एका मित्राने दुसऱ्याचा जीव घेतला!””त्याहून धक्कादायक म्हणजे, खून केल्यानंतर तोच मित्र पोलिसांना कॉल करून इतर तीन ते चार तरुणांनी हल्ला केल्याचं पोलिसांना सांगतो… अवघ्या दोन तासातच पोलीस कसून तपास करून या खुनाचा छडा लावतात.. आता हा आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून त्याची कसून चौकशी सुरू आहे त्याचा चौकशीतून अजून कोणती धक्कादायक माहिती पुढे येते ते पाहणार आता महत्त्वाचा असणार आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: रांजणगाव MIDC तील कंपनीत टेम्पो आणि रॅम्पमध्ये चेंगरून चालकाचा मृत्यू…

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या टेम्पोच्या मागील बाजूचा पडदा बांधत असताना…

4 तास ago

शिरूर! पिंपळे जगताप पाझर तलावातील खुनाचा तीन दिवसांत छडा; तिघांना अटक; कारण उघड…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे) : पिंपळे जगताप येथील पाझर तलावात आढळलेल्या अज्ञात युवकाच्या खुनाचा शिक्रापूर पोलिसांनी…

8 तास ago

‘स्मार्ट मीटर’वरून पुन्हा वाद; ग्राहकांचे प्रश्न, पारदर्शकतेची मागणी

वीजबिल, माहितीचा अधिकार आणि तक्रार निवारणावर 'स्टेट ड्राईव्ह'मधून उपस्थित झाले प्रश्न मुंबई: राज्यात स्मार्ट मीटरच्या…

10 तास ago

सोनम वांगचूक यांच्या अटकेविरोधात मुंबईत राष्ट्रवादी आक्रमक

मुंबई विद्यापीठाबाहेर तीव्र आंदोलन; केंद्र सरकारवर दडपशाहीचा आरोप, मिलिंद अण्णा कांबळे यांचा इशारा मुंबई: दिल्लीतील…

10 तास ago

रामरक्षेपूर्वी स्वतःची रक्षा करा”; उबाठाच्या आंदोलनावर एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

राहुल गांधी, सोनिया गांधी, अखिलेश यादव यांना आधी निमंत्रण द्या; बाळासाहेबांच्या विचारांचा उल्लेख करत शिंदेंची…

11 तास ago

डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या निधनाने गांधी विचाराचा सच्चा पाईक हरपला; हर्षवर्धन सपकाळ यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, गांधीवादी नेते आणि युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या…

11 तास ago