महाराष्ट्र

कोथरुड पोलिसांच्या चौकशीत तरुणींना जातीवाचक शिवीगाळ; सुप्रिया सुळे आक्रमक

पुणे: पुण्यातील कोथरुड पोलीस ठाण्यात तिघी तरुणींवर अपमानास्पद वागणूक दिल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. संभाजीनगरहून आलेल्या विवाहित महिलेला मदत केल्याच्या कारणावरून या तरुणींना संशयित म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र, चौकशीदरम्यान त्यांच्याशी जातिवाचक, आक्षेपार्ह भाषेत बोलण्यात आले आणि मारहाणही झाल्याचा आरोप या तरुणींनी केला आहे.

संबंधित घटना अशी घडली की, संभाजीनगरमधील एक विवाहित महिला कौटुंबिक त्रासामुळे पुण्यातील मैत्रिणींकडे एका दिवसासाठी राहायला आली होती. तिची अनुपस्थिती लक्षात आल्यावर तिच्या हरवल्याची तक्रार स्थानिक पोलिसांत दाखल झाली. मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलीस कोथरुडमध्ये पोहोचले. त्यानंतर संबंधित महिलेला शोधून काढण्यात आलं आणि तिच्यासोबत राहणाऱ्या तीन तरुणींना पोलिसांनी चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेलं. या तीन मुलींच्या म्हणण्यानुसार, चौकशी दरम्यान पोलिसांनी त्यांच्याशी अवमानकारक भाषेत संवाद साधला, त्यांचे कपडे आणि वागणूक यावरून टीका केली, आणि जातिवाचक शिवीगाळ करत शारीरिक दमदाटी केली.

पीडितांपैकी एका मुलीने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत हा संपूर्ण प्रकार जगजाहीर केला आहे.या आरोपांमध्ये कोथरुड पोलीस ठाण्याच्या एका महिला अधिकाऱ्यांसह संभाजीनगर पोलीस ठाण्याचे एक अधिकारीही सामील असल्याचं नाव पुढे आलं आहे. पोलिसांकडून मात्र सर्व आरोप फेटाळण्यात आले असून, “फक्त चौकशीसाठी प्रश्न विचारण्यात आले, कोणतीही मारहाण किंवा असभ्य भाषा वापरण्यात आलेली नाही,” असे त्यांचे म्हणणे आहे.

सुप्रिया सुळेंची तीव्र प्रतिक्रिया

घटनेची दखल घेत खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावरून यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, “माझ्या व्हॉट्सअ‍ॅपवर या प्रकरणासंबंधी व्हिडीओ आला असून, जर यात तथ्य असेल, तर ही अतिशय धक्कादायक बाब आहे. गृहमंत्रालयाने याकडे गांभीर्याने पाहून तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. या प्रकरणामुळे पुण्यात पुन्हा एकदा पोलीस वर्तनावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. पोलिसी चौकशी आणि मानवतेचा समतोल राखण्याची गरज अधोरेखित करणारी ही घटना आता राज्यव्यापी चर्चेचा विषय बनली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

2 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

6 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

6 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

6 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

6 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

6 तास ago