क्राईम

रांजणगाव MIDC पोलीसांनी फोनवरुन मालाची ऑर्डर देवुन फसवणुक करणा-या महाठकाचा केला फर्दाफाश

रांजणगाव गणपती (तेजस फडके) सध्या फसवणुकीची वेगवेगळी उदाहरणे समोर येत असुन” जस्ट डायल” वरती फोन करून वेगवेगळ्या परिसरातील नामांकित बँटरी, कपडे, सिलाई मशिन, पेंड विक्रेते, तेल विक्रेते यांचे नंबर प्राप्त करून त्यावरून संबंधित दुकानदारांना फोन करुन मी दानशुर मारवाडी असुन मला अनाथ आश्रम, वृध्दाआश्रम यांना कपडे, बॅटरी, सिलाई मशिन, तेलाचे डब्बे असे दानधर्मासाठी पाहिजे आहेत. असे सांगत फोनवर मालाची ऑर्डर देवून नंतर माल घेऊन लंपास करत फरार होऊन लोकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या एका महाठकास रांजणगाव MIDC पोलिसांनी मोठया शिताफिने अटक केले असुन त्याच्याकडुन 10 लाख 35 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कारेगाव येथील फलकेमळा येथून दि. 30 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 1 च्या सुमारास बॅटरी व्यावसायिक ऋत्विक मनोहर गिरीधर (रा. शिरुर, ता. शिरुर, जि. पुणे) यांना एका अनोळखी व्यक्तीने चार बॅट-यांची ऑर्डर दिल्याने सदरची ऑर्डर घेवुन कारेगाव येथे जात होते. त्यावेळी त्यांना एक पांढ-या रंगाच्या चारचाकी गाडीतून दोन अनोळखी इसमांनी येवुन त्यांना दमदाटी, मारहाण करण्याची धमकी देवुन त्यांच्याकडील 77 हजार 700 रुपये किंमतीच्या बॅट-या जबरदस्तीने चोरुन नेल्या होत्या. याप्रकरणी ऋत्विक गिरीधर यांनी रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनला दोन अनोळखी व्यक्तींविरुध्द फिर्याद दिल्याने जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

सदरचा गुन्हा उघडकिस आणण्याबाबत रांजणगाव MIDC चे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी तपास पथकातील सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल विजय शिंदे, उमेश कुतवळ यांना सुचना दिल्याने तपास पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे सदर गुन्हयातील आरोपी 1) दिपक गणेश गुगळे (वय 23) रा.बडुले खुर्द, ता. शेवगाव, जि.अहमदनगर 2) शाहबाज जुबेर शेख (वय 34) रा. बाजार भिंगार, ता.जि.अहमदनगर यांना ताब्यात घेवुन गुन्हयाचे कामी अटक केली आहे. अटक आरोपीनी पोलीस कोठडी दरम्यान सदर गुन्हयाची कबुली दिली असुन त्याच्याकडुन चोरलेला मुद्देमाल व गुन्हयात वापरलेली ईरटिगा गाडी क्र. MH 12 JU 6597 हि जप्त केली आहे.

 

सदर गुन्हयातील आरोपी दिपक गुगळे याच्याकडे अधिक सखोल तपास केला असता त्याने अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड, भिंगार, कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अनेक गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. त्या गुन्हयांबाबत तपास केला असता असे निष्पन्न झाले की, आरोपी दिपक गुगळे हा “जस्ट डायल” वरती फोन करून वेगवेगळ्या परिसरातील नामांकित बँटरी, कपडे, सिलाई मशिन, पेंड विक्रेते, तेल विक्रेते यांचे नंबर प्राप्त करून त्यावरून संबंधित दुकानदारांना फोन करुन सांगायचा की, मी अहमदनगर येथील दानशुर मारवाडी असुन मला आनाथ आश्रम, वृध्दाआश्रम यांना कपडे, बॅटरी, सिलाई मशिन, तेलाचे डब्बे असे दानधर्मासाठी पाहिजे आहेत. असे सांगुन त्यांच्याकडुन मालाची ऑर्डर एखाद्या पत्यावर पाठवुन देण्यासाठी सांगत होता. दुकानदार देखील मोठी पार्टी मिळाल्याच्या आनंदात काहीही विचार न करता ऑर्डरप्रमाणे माल गाडीमध्ये भरुन पाठवुन द्यायचे. त्यानंतर आरोपी गुगळे हा दुकानदाराकडुन गाडी चालकाचा नंबर घेवुन त्यास दिलेल्या पत्याच्या आलीकडेच 80 टक्के माल खाली करून 20 टक्के माल पुढे दुस-या पत्यावर घेवुन ये, तेथे आल्यावर सर्व पैसे देतो असे सांगायचा. त्यानंतर आरोपी गुगळे हा ताब्यात आलेल्या 80 टक्के मुद्देमालासह गायब होवुन फोन बंद करत होता. त्यानंतर गाडी ड्रायव्हर उर्वरीत 20 टक्के मालासह पैसे न घेता परत दुकानात आल्यावर दुकानदाराला आपली फसवणुक झाल्याचे लक्षात यायचे. अशा प्रकारे आरोपी गुगळे याने त्याचा साथीदार आरोपीसह खालील ठिकाणी एकुन 5 गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे.

 

सदरची कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधिक्षक मितेश गट्टे, शिरुरचे उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत गवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश ढवाण, सहायक पोलीस निरीक्षक अनिल मोरडे, पोलीस उपनिरीक्षक सुहास रोकडे, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ, विजय शिंदे, पोलिस हवालदार विलास आंबेकर, तेजस रासकर, माणिक काळकुटे, संतोष औटी व वैज्जनाथ नागरगोजे यांनी केली आहे. सदर गुन्हयांचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुहास रोकडे हे करत आहेत.

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त कामगार प्रश्नांवर प्रकाश; नव्या कायद्यांमुळे संमिश्र चित्र

मुंबई: कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कामगारांच्या स्थितीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली…

10 तास ago

महाविकास आघाडी एकसंघ; अंबादास दानवे यांना काँग्रेसचा ठाम पाठिंबा

मुंबई: आगामी राज्यसभा व विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (मविआ) घटक पक्षांमध्ये सकारात्मक व…

10 तास ago

शिरुर तालुक्यात बैलगाडा शर्यतीदरम्यान अपघात; निष्काळजीपणामुळे एकाचा मृत्यू…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील करंदी येथे आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीदरम्यान झालेल्या अपघातात प्रकाश…

15 तास ago

शरीराचे अवयव व त्याला निष्काळजीपणामुळे होणारे आजार

१) पोट: केव्हा बिघाडते, जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही. २) मूत्रपिंड: केव्हा बिघडतात जेव्हा…

1 दिवस ago

मुंबईच्या पवई–चांदिवली उद्यानांना ‘सुरक्षा कवच’; गैरप्रवृत्तींवर विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश

मुंबई: मुंबईतील पवई व चांदिवली परिसरातील महानगरपालिका उद्यानांमध्ये अंमली पदार्थ सेवन आणि इतर गैरप्रवृत्तींना आळा…

1 दिवस ago

व्यावसायिक चालकांसाठी ‘व्यवहारिक मराठी’ अनिवार्य; न शिकणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

मुंबई: महाराष्ट्रात प्रवासी वाहन चालवणाऱ्या प्रत्येक व्यावसायिक चालकाला ‘व्यवहारिक मराठी’ येणे बंधनकारक करण्याबाबत राज्य सरकार…

1 दिवस ago