क्राईम

शिक्रापूर पोलिसांकडून दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद

तिघा युवकांकडून पिस्तूल तलवार चाकू दोरी सह साहित्य जप्त

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशनचे पोलीस पथक २१ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास गस्त घालत असताना एका ठिकाणी दरोड्याच्या तयारीतील युवक थांबल्याची माहिती मिळाली असता पोलिसांच्या पथकाने सदर युवकांना ताब्यात घेत त्यांच्याकडून पिस्तूल, तलवार, कोयता, चाकू, मिरची पूड जप्त करत विकी उर्फ विवेक उर्फ दाद्या राजेश खराडे, आदित्य नितीन भोईनल्लू, आदिन जैनोद्दीन शेख यांच्यासह दोघा युवकांवर गुन्हे दाखल केले आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशनचे पथक २१ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गस्त घालत असताना तळेगाव न्हावरा रोड लगत टाकळी भीमा घोलपवाडी येथे काही युवक संशयितपणे दबा धरुन बसल्याची माहिती सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे यांना मिळाली. त्यानंतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे, पोलीस हवलदार श्रीमंत होनमाने, अमोल दांडगे, विकास पाटील, शिवाजी चितारे, जयदीप देवकर, निखिल रावडे, लखन शिरसकर, किशोर शिवणकर, विकास मोरे यांनी सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता तळेगाव न्हावरा रोड तेथील राहुल करपे यांच्या प्लॉटिंगमध्ये पाच युवक बसल्याचे पोलिसांना दिसले. मात्र पोलीस आल्याची चाहूल लागतात सर्व युवक पळून जाऊ लागले.

दरम्यान पोलिसांनी पाठलाग करत तिघा युवकांना जागेवर पकडत त्यांची झडती घेतली असता त्यांच्या जवळ एक पिस्तूल, दोन जिवंत काडतूस, तलवार, कोयता, बॅटरी, मिरची पूड, दोरी असे साहित्य मिळून आले. पोलिसांनी सर्व साहित्य जप्त करत पळून गेलेल्या युवकांची नावे विचारले असता तिघेही युवक उडवा उडवीची उत्तरे देऊ लागले, तर पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता आम्हाला खर्चासाठी व फिरण्यासाठी पैशाची आवश्यकता असलेल्या आम्ही येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना अडवून त्यांची हत्याराच्या धाकाने लुटमार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

याबाबत पोलीस शिपाई निखिल भिमाजी रावडे रा. शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी विकी उर्फ विवेक उर्फ दाद्या राजेश खराडे (वय १९), आदित्य नितीन भोईनल्लू (वय २०), आदीन जैनोद्दीन शेख (वय १९) तिघे रा. शिरुर (ता. शिरुर) जि. पुणे तसेच दोन अनोळखी युवक (नाव पत्ता माहीत नाही) यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करत त्यांना अटक केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन आतकरे व पोलीस नाईक रोहिदास पारखे हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा! सांगवीत लोखंडी कमान कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…

9 तास ago

रक्ताचे नातेवाईक कुणीच पुढे आले नाहीत; ग्रामपंचायतीने स्वीकारली अंत्यविधीची जबाबदारी

आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…

10 तास ago

सोलापुरात अघोषित भारनियमनावर पालकमंत्री संतापले; स्वाभिमानीचा पलटवार

सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…

10 तास ago

‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांचा दुर्दैवी अंत; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…

10 तास ago

कायद्याची लाठी सर्वांसाठी समान आहे का? संतोष पंडित यांच्या अटकेने महाराष्ट्रासमोर मोठा सवाल!

लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…

10 तास ago

शिक्षक हे भविष्याचे खरे शिल्पकार; गुणवत्तापूर्ण शिक्षणातून सक्षम समाजाची उभारणी; सुनेत्रा पवार

पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…

10 तास ago