क्राईम

विठ्ठलवाडीत पती व सासऱ्याकडून महिलेला मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथे घरगुती वादातून एका महिलेच्या पती व सासऱ्याने महिलेला मारहाण केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे चंद्रकांत नारायण गवारे, कुणाल चंद्रकांत गवारे व धनश्री विजय गवारे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथील कांचन गवारे यांचे घरगुती वाद झालेले असल्याने महिला माहेरी गेलेली होती. चार दिवसांनी महिला परत घरी आली असता घराला कुलूप असल्याने तिने मुलाला सासऱ्यांकडून चावी आणण्यास सांगितले. यावेळी महिलेचा सासरा चंद्रकांत गवारे सदर ठिकाणी येत महिलेला शिवीगाळ करु लागला यावेळी महिलेची जाऊ धनश्री गवारे हिने महिलेच्या सासऱ्याला काठी आणून दिली असता सासऱ्याने महिलेला काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर लगेचच महिलेच्या पतीने महिलेला शिवीगाळ दमदाटी करुन जीवे मारण्याची धमकी दिली.

याबाबत कांचन कुणाल गवारे (वय ३२) रा. विठ्ठलवाडी (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी चंद्रकांत नारायण गवारे, कुणाल चंद्रकांत गवारे व धनश्री विजय गवारे तिघे रा. विठ्ठलवाडी (ता. शिरुर) जि. पुणे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार किशोर तेलंग हे करत आहे.

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

तीन हजारांच्या पारितोषिकासाठी अनवाणी धावली आई; आता देशभरातून मदतीचा हात

बीड : मुलींच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी अवघ्या तीन हजार रुपयांच्या पारितोषिकाच्या आशेने अनवाणी धावत, हातात…

17 तास ago

हेक्टरी १ लाखांची मदत, सरसकट कर्जमाफी आणि विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करण्याची हर्षवर्धन सपकाळांची मागणी

मुंबई/बुलढाणा: मागील ४० ते ४५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके करपून गेली असून राज्यातील शेतकरी गंभीर…

17 तास ago

शिरूर तालुक्यात क्रिकेट खेळण्यावरून तुफान राडा; बॅट-स्टंपने मारहाण; पाच जणांना अटक…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाल्याची घटना…

1 दिवस ago

पाबळ-कान्हूर-केंदूर! निवडणूक आली की पाण्याची चर्चा; टंचाई मात्र कायमच!

पाबळ (सुनिल जिते) : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील पाबळ, कान्हूर मेसाई आणि केंदूर परिसरात यंदा…

1 दिवस ago

रांजणगावमध्ये कोयत्याने जीवघेणा हल्ला करणारे आरोपी 12 तासात अटक LCB आणि रांजणगाव MIDC पोलिसांची संयुक्त कारवाई

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव येथील वामन वाईन्ससमोर किरकोळ वादातून तरुणावर आणि त्याला वाचवण्यासाठी मध्ये…

2 दिवस ago

शिरुर शहरात गोळीबार करणाऱ्या तिघांना DB पथकाने सुपा टोलनाक्यावर सापळा लावत ४८ तासांत घेतलं ताब्यात

शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरातील लाटेआळी-आंबेडकरनगर परिसरात शुक्रवारी (१८) सकाळी साडे-सहाच्या सुमारास झालेल्या गोळीबारात हरिष…

2 दिवस ago