crime
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरुरमध्ये पोलिस उपविभागीय कार्यालयाकडून मटक्यावर कारवाई करण्यात आली असून, दोन जणांवर जुगार कायदा कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
शिरूर उपविभागीय पोलिस आधिकारी यशवंत गवारी यांच्या कार्यालयीन पथकातील पोलिस उपनिरीक्षक रघूनाथ शिंदे यांनी सहकाऱ्यांसह शिरूर शहरामध्ये सिध्दार्थ नगर येथील अण्णाभाऊ साठे चौकातील ऑनलाईन स्कील गेम नावाचे बंदीस्त पत्रा शेडमध्ये ऑनलाईन लॉटरी व व्हिडीओ गेम तसेच कल्याण नावाचा मटका खेळत असताना दोघांना रंगेहात पकडून साहित्य व रोख रकमेसह एकूण 1,07,370/- रु. मुद्देमाल जप्त करून गुन्हे दाखल केले आहेत.
या बाबत सविस्तर हकीकत अशी की, शिरुर शहरातील सिध्दार्थ नगर येथील अण्णाभाऊ साठे चौकातील ऑनलाईन स्कील गेम नावाचे बंदीस्त पत्रा शेडमध्ये ऑनलाईन लॉटरी व व्हिडीओ गेम तसेच कल्याण नावाचा मटका फयाज अब्दुल सय्येद (वय 34, रा. हलदी मोहल्ला, शिरूर ता शिरूर जि पुणे) हा आपले ओळखीच्या लोकांना बोलावून घेवुन खेळवित असताना सोमवारी (ता. १६) मिळून आला आहे. त्यास सदर जुगार मालकाचे नाव पत्ता विचारले असता त्याचे नाव हबिब अब्दुल सय्यद (रा. हुडको कॉलणी, शिरुर ता शिरूर जि पुणे) असे असल्याचे सांगीतले. पोलिस हवालदार रमेश दिनेश कुंभार यांनी याबाबत १) फयाज अब्दुल सय्येद वय 34 वर्षे, रा. हलदी मोहल्ला, शिरुर ता शिरूर जि पुणे, २) हबिब अब्दुल सय्यद रा. हुडको कॉलणी, शिरुर ता शिरूर जि पुणे यांचच्याविरुध्द मुं. जू. कायदा कलम ४, ५ प्रमाणे कायदेशिर फिर्याद दाखल केली आहे.
शिरूर तालुक्यातील व्यक्तीने मोबाईल कंपनीला दिला दणका; मिळणार रक्कम…
शिरूर तालुक्यात अंकाऊंट साफ करणारा पोलिसांच्या जाळयात…
कानून के हाथ बहोत लंबे होते है…ना FIR ना पुरावा… तरीही रांजणगाव पोलिसांनी ठोकल्या आरोपीला बेड्या
मोठी बातमी! शिरुर तालुक्यात फिनेलच्या नावाखाली ड्रग्जची निर्मिती; १७४ किलो ड्रग्ज जप्त
मुंबई: राज्याच्या राजकारणात फोडाफोडीचे सत्र सुरू असतानाच आता ठाकरे गटाबाबत मोठा दावा करण्यात आला आहे.…
नागपूर: राज्यात ओबीसी आरक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, ओबीसी समाजाचे राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक…
मुंबई: गोरेगाव येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत आणि लगत राहणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनाला आता गती…
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…
एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…
पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…