महाराष्ट्र

Video: भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी…

पुणे: पुणे जिल्ह्यातील बारा ज्योतिर्लिंगपैकी असलेले भीमाशंकर मंदिराच्या परिसरात पुजाऱ्यांमध्ये झालेल्या फ्री स्टाईल हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिसांसमोरच पुजाऱ्यांच्या गटात हाणामारी सुरु असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. मंदिरात पूजेच्या अधिकारावरून गुरवांच्या दोन गटात हाणामारी झाल्याची माहिती पुढे आली आहे. याप्रकरणी खेड पोलिसात 36 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

‘भाविकांची दर्शनासाठी रांग सुरु होती. काही पुजारी मंदिर गाभाऱ्यात पाटावर पुजेसाठी बसलेले होते. यावेळी दुसरा गटाचा जमाव मंदिराच्या गाभाऱ्यात घुसला. पाटावर बसलेले पुजारी विजय कौदरे यांना दमदाटी करू लागले. त्यांना पाटावरून उठवले आणि शिविगाळ करून धक्काबुक्की केली. हाताने, लाथा बुक्क्यांनी मारहाण केली,’ अशी तक्रार गौरक्ष कौदरे यांनी दिली आहे. त्यावरून एका गटाच्या पंधरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शंकर कौदरे यांच्या तक्रारीनुसार 21 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोदरे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मंदिरात पुजेच्या कारणावरून प्लास्टिक खुर्ची आणि लोखंडी पाईपने मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान दोन्ही गटांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.

व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, ‘काही पुजारी आपापसात हाणामारी करत आहेत. सदर ठिकाणी पोलिस कर्मचारी एकमेकांना मारहाण करणाऱ्या पूजाऱ्यांना आवर घातलाना दिसत आहेत. मात्र, पुजारी पोलिस कर्मचाऱ्यांना न जुमानता शिवीगाळ करत एकमेकांवर धावून जात आहेत.’

Video: इंदोरीकर महाराजांच्या घरात शिरला बिबट्या अन्…

Video: दुचाकीवर कोंबड्या, श्वानासह किती जण बसलेत मोजाच…

Video: चक्क खाटेपासून बनवली ‘फोर व्हिलर’…

Video: रुग्णालयात भुताटकी? रात्रीच्यावेळी लाकडी शिडी लागली आपोआप चालू…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…

2 दिवस ago

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…

4 दिवस ago

तळेगाव ढमढेरे ते एल अँड टी फाटा रस्त्यावरील ‘ते’ बॅनर ठरत आहेत चर्चेचा विषय

तळेगाव ढमढेरे (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे गावातील अतिशय महत्त्वाचा तसेच वर्दळीचा आणि पुणे-नगर…

5 दिवस ago

Video; तळेगाव-न्हावरे रस्त्यावर नियंत्रण सुटल्याने मालवाहू ट्रक उलटला; चालक गंभीर जखमी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव-न्हावरे रस्त्यावर (NH548D) न्हावरेच्या बाजुने तळेगाव ढमढेरेच्या दिशेने जाणारा भरधाव…

5 दिवस ago

आज दिवसभर प्रेक्षकांना ZEE TV वर ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ चित्रपटाची पर्वणी

शिरुर (तेजस फडके) आज (दि 12) मे रोजी दिवसभर झी वाहिनीच्या विविध चॅनलवर स्वराज्याचे दुसरे…

6 दिवस ago

जेव्हा सगळे शेपूट घालुन बसले होते. तेव्हा हा पठ्या भांडलाय तुमच्यासाठी; डॉ कोल्हे यांचा अजित पवारांना टोला

शिरुर (तेजस फडके) ज्या भारतीय जनता पक्षाची तळी घेऊन आता तुम्ही एका शेतकऱ्याच्या पोराला पाडायला…

1 आठवडा ago