crime
शिरूर : शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथील पोलिस चौकीपासून हाकेच्या अंतरावर मटका अड्डा सुरू होता. पण, पोलिसांना याबद्दल काहीच माहित नव्हते. अखेर पोलिस चौकीजवळ असलेल्या या मटका अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने (LCB) छापा टाकत मोठी कारवाई केली आहे.
कोरेगाव भीमा येथील वढू रस्त्यालगत असलेल्या खुशबू पान शॉपसमोर, एका हॉटेलच्या शेडमध्ये ‘कल्याण’ नावाचा मटका बेधडकपणे खेळला जात होता. याबाबतची माहिती एलसीबीला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिस उपनिरीक्षक अभिजित सावंत आणि त्यांच्या पथकाने अचानक छापा टाकला. यावेळी काही लोक कागदावर आकडे लिहून मटका खेळवताना रंगेहाथ सापडले. पोलिसांनी छापा टाकताच एकच गोंधळ उडाला.
पोलिसांनी या छाप्यात मटक्याचे साहित्य आणि रोख रक्कम असा एकूण एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी मटका चालक आणि जागा मालकासह तब्बल १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरुण वानखेडे, दत्तात्रय कान्हूरकर, ज्ञानेश्वर थोरात, अविनाश शिवले, विराज आलम, कुंडलिक राठोड, सोमनाथ माने, वसंत सुपेकर, परमेश्वर शिंदे, श्रीमंत आबा पाटील, दत्ता वारघडे आणि जागा मालक राऊतमामा अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
दरम्यान, पोलिस चौकी शेजारीच हा अवैध धंदा सुरू असताना स्थानिक पोलिसांना याची कुणकुण कशी लागली नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. स्थानिक गुन्हे शाखेला येऊन ही कारवाई करावी लागली. या कारवाईमुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.
शिरूरमध्ये गुन्हेगारीचा सुळसुळाट; निलेश वाळुंज यांचा १५ एप्रिलपासून बेमुदत सत्याग्रह…
शिरूर पोलिसांनी जबरी चोरी प्रकरणाचा केला उलगडा, आरोपी गजाआड, सोनेही जप्त…
शिरूर! पुणे-नगरमहामार्गावर कारला धक्का लागल्याने कंटेनरच पेटवला…
Video! शिरूर तालुक्यातील सविंदणे गावात हवेत गोळीबार; गुन्हा दाखल…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील रांजणगाव पोलिस स्टेशन हद्दीतील एका गावात अवघ्या सहा वर्षांच्या चिमुरडीवर…
नांदेडमध्ये पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जाहीर सभा; अजितदादांच्या विकासाच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन नांदेड: अजितदादा…
शेतकरी कुटुंबांतील महिलांना शिलाई मशीन, मुलींच्या विवाहासाठीही मदत; डोंबिवलीतील नवरात्रोत्सवातून सामाजिक बांधिलकीचा संदेश डोंबिवली :…
मुंबई: ग्रंथ माणसाला घडवण्याचे काम करतात. ही अमूल्य ग्रंथसंपदा उद्याच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रंथालयांचे जतन आणि…
मुंबई: बाराव्या राष्ट्रीय इन्स्पायर–मानक प्रदर्शन व प्रकल्प स्पर्धेत महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. राज्यातून…
कारेगाव (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील निमगाव भोगी येथे बिबट्याने मध्यरात्री गोठ्यात घुसून जनावरांवर हल्ला केल्याची…